घरताज्या घडामोडीमहाराष्ट्र बंदला नाशिकमध्ये समिश्र प्रतिसाद

महाराष्ट्र बंदला नाशिकमध्ये समिश्र प्रतिसाद

Subscribe

राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी), नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि देशात ढासळलेल्या अर्थव्यवस्थेविरोधात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी (दि.२४) महाराष्ट्र बंदची हाक दिली. आघाडीचे जिल्हाध्यक्ष पवन पवार यांच्या नेतृत्वात शुक्रवारी नाशिक शहर व जिल्ह्यातही बंद पाळण्यात आला. बंदला नाशिक शहरात समिश्र प्रतिसाद मिळाला. नाशिकरोड परिसरात कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून गंगापूर, शालिमार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासह शहरात ठिकठिकाणी निदर्शने केली.

देशात एनआरसी आणि सीएए विरोधात वातावरण आहे. सरकार दडपशाही करून हा कायदा लागू करू पाहत आहे. जीएसटी, नोटबंदीमुळे अर्थव्यवस्था कोलमडली आहे. पुरेसा निधी नसल्यामुळे सरकारने देशाच्या राखीव पुंजीला हात घातलेला आहे. या सर्वाला केंद्र सरकार जबाबदार असून त्याचा निषेध करण्यासाठीच महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला. बंदमध्ये विविध संघटना सहभागी झाल्या होत्यानाशिकरोड परिसरात शांततेच्या मार्गाने आंदोलन करुन बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आले.

पोलिसांनी 19 जणांना घेतले ताब्यात

- Advertisement -

शालिमार येेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पदाधिकार्र्‍यांनी निदर्शने करून घोषणाबाजी केली. व्यावसायिकांनी आपले दैनंदिन व्यवहार सुरळीत ठेवले होते. 25 कार्यकर्त्यांनी व्यावसायिकांना व्यवहार बंद करा, असे सांगितले. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. भद्रकाली पोलीसांनी गांभीर्य लक्षात घेऊन कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणत कारवाई केली.

- Advertisement -

 

शालिमार परिसरात बाजारपेठ बंद

शालिमार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर वंचित बहुजन आघाडीचे नाशिक तालुकाध्यक्ष बाळासाहेब गांगुर्डे, उपजिल्हाध्यक्ष शारदा दोंदे, दीपक डोके, अमीन शेख, मुकुंद गांगुर्डे, किशोर गांगुर्डे, रवी पगारे, सिद्धार्थ तेजाळे, नंदकुमार जाधव, मनोहर दोंदे, सचिन जाधव, संदीप जगताप, सुनील पवार, सुरेश उबाळे, मीना गांगुर्डे मीना उबाळे, संतोष भरीत, संदीप भरीत यांनी निदर्शने केली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी परिसरातील व्यावसायिकांना बंदचे आवाहन केले. त्यास प्रतिसाद देत व्यावसायिकांनी दिवसभर दुकाने बंद ठेवली. दुकाने बंद असल्याने शालिमार परिसरात तुरळक स्वरुपात गर्दी होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -