घरमहाराष्ट्रनाशिकउमेदवारांचे मनोमिलन सेनेला तारणार

उमेदवारांचे मनोमिलन सेनेला तारणार

Subscribe

शिवसेनेच्या उमेदवारीवरूवरून इच्छुकांमध्ये सुरू झालेल्या कुरघोडीच्या राजकारणाचा पहिला अध्याय शनिवारी मातोश्रीवरील मनोमिलनामुळे संपुष्टात आल्याचे चित्र निर्माण करण्यात आले. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे आणि निवडणूकीस इच्छुक जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी एकत्रितरित्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे भेट घेऊन सारेकाही आलबेल असल्याचे सांगितले. त्यामुळे विस्कळत चाललेली पक्षाची घडी वेळीच सावरली गेल्याने आता किमान उमेदवारीवरून कलगीतुरा रंगणार नाही, असे म्हणावे लागेल.

शिवसेनेच्या उमेदवारीवरूवरून इच्छुकांमध्ये सुरू झालेल्या कुरघोडीच्या राजकारणाचा पहिला अध्याय शनिवारी मातोश्रीवरील मनोमिलनामुळे संपुष्टात आल्याचे चित्र निर्माण करण्यात आले. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे आणि निवडणूकीस इच्छुक जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी एकत्रितरित्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे भेट घेऊन सारेकाही आलबेल असल्याचे सांगितले. त्यामुळे विस्कळत चाललेली पक्षाची घडी वेळीच सावरली गेल्याने आता किमान उमेदवारीवरून कलगीतुरा रंगणार नाही, असे म्हणावे लागेल.

नाशिक बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंबळे यांनी पक्षशिस्त मोडून परस्पर आपली उमेदवारी जाहीर केल्यामुळे सेनेंतर्गत बंडाळी उफाळून आली. अगोदरच जिल्हाप्रमुख करंजकर हे आयात उमेदवाराच्या विरोधात जात असल्याने त्यांनी स्वत: ईच्छा दर्शवत गोडसेंचा वारु अडविण्याचा प्रयत्न केला. परिणामी, इच्छुकांच्या यादित कुंपणावर बसलेल्या चुंबळेंनी आपली सुप्त ईच्छा व्यक्त करून सेनेच्या अडचणींमध्ये मोलाची भर घातली. काही महिन्यांपूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सेनेच्या शिवाजी सहाणे यांनी अशाच पद्धतीने आपली उमेदवारी जाहीर केली होती. पक्षाने त्यांच्या शिस्तभंगाची कारवाई करत शिवबंधन काढून घेतले. त्यामुळे इच्छा नसताना शहाणे यांना नाइलाजाने राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी करावी लागली. तोच मापदंड चुंबळेंना लागू करणार का? असा प्रश्न आता शिवसैनिक विचारु लागले आहेत. एकाच पक्षातून तीन इच्छुक आपली दावेदारी सांगतात आणि पक्षाकडे आस लावून बघतात, हा तर मुजोरपणा म्हणावा लागेल. निष्ठावंत म्हणून वर्षानुवर्ष एका पक्षाचे काम करायचे आणि ऐन निवडणूकीत पक्षाविरोधात दंड थोपटायचे, हे कोणत्या सूत्रात बसते, याचा विचार पक्षश्रेष्ठींना करावाच लागेल. अन्यथा, युतीनंतर जागा सुटल्यावरही उमेदवाराचा प्रश्न अनुउत्तरीत राहिल्यास विरोधकांना त्याचा फायदा होणे स्वाभाविक आहे.

- Advertisement -

याच धोरणातून सेनेला विचलित करण्यासाठी विरोधकांनी ही चाल खेळली असावी, अशी शंका घेण्यास जागा उरते. त्यामुळे पक्षातील उमेदवारांमध्ये निर्माण झालेली सापट वेळीच बुजवून पक्षाने डॅमेज कंट्रोल करण्याचा चांगला प्रयत्न केला. परंतु, चुंबळे यांच्या विरोधात पक्ष काय भूमिका घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. पक्षाचा झेंडा उंचावण्याची हीच योग्य संधी आहे, मनोमिलनाच्या निमित्ताने सेनेच्या शिलेदारांनी ती साधली. आता आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रचाराचा धुराळा उडेल आणि खर्‍या अर्थाने निवडणूक रणधुमाळी सुरू होईल. प्रचारातदेखील हा एकोपा दाखवावा लागेल व टिकविण्याचेसुद्धा आव्हान राहणार आहे.

दुसर्‍या ‘शिवाजीं’वर कारवाई?

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवाजी सहाणे यांनी परस्पर आपली उमेदवारी जाहीर केली म्हणून, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांची हकालपट्टी करण्यात आली. त्यामुळे राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. आता एन निवडणुकीच्या तोंडावर शिवाजी चुंभळे यांनी परस्पर आपली उमेदवारी जाहीर केली. या दुसर्‍या शिवाजींविरोधात पक्ष काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -