तारुखेडले ग्रामपंचायत ठराव प्रकरण : तक्रारीच्या बदल्यात अधिकार मोडीत काढण्याचा ठराव

बीडीओकडून तसं काही झालं नसल्याचा सूर

Nashik

निफाड तालुक्यातील तारुखेडलेत ग्रामसेवक व इतर कर्मचारी कामावर सतत गैरहजर असल्याची तक्रार प्रशांत गवळी यांनी १५ फेब्रुवारी २०१९ ला केली होती. या तक्रारीची दखल घेत जिल्हा परिषदेने पुढील चौकशीसाठी पंचायत समिती, निफाड यांना तक्रार वर्ग केली. मात्र, कार्यालयाने संबंधी तक्रार ग्रामपंचायत स्तरांवर पाठवून तक्रारीचा अहवाल मागवला होता. मात्र, तारुखेडले ग्रामपंचायत स्तरावरून कामकाज सुरळीत चालू आहे.

निफाड बिडिओ यांना ग्रामपंचायतीचा अजब सल्ला

ग्रामसेवक, कर्मचारी कामावर वेळेवर हजर असल्याचा एक पंचनामा करून सदर अहवाल पंचायत समितीला सादर करण्यात आला. मात्र, याच तक्रारीच्या उत्तरात (अहवालात) सदर ग्रामपंचायत सरपंच, सदस्यांनी प्रशांत गवळी यांच्या ऑनलाईन तक्रारी दखल घेऊ नये, अशा आशयाचा ठराव करून प्रशांत गवळी यांच्या उत्तरात ठरावाच्या प्रती पाठवून संविधानाने दिलेल्या अधिकाराची गळचेपी ग्रामपंचायत, पंचायत समितीसह जिल्हा परिषद नाशिक यांनी केली आहे.

‘आपलं महानगर’ ने १२ ऑगस्टच्या अंकात याबाबत वृत्त प्रसिध्द केले होते. यावेळी सदर प्रकाराबाबत निफाडचे बीडीओ संदीप कराड यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, कराड यांनी असं काही झाले नसल्याचे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here