काँग्रेस नेते म्हणजे घोटाळ्यांचा आदर्श

नाशिकमधील जाहीर सभेत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर शरसंधान साधले

Nashik
Nashik_Uddhav Thakrey

काँग्रेस नेत्यांनी घोटाळ्यातही आदर्श उभा केला. जनावरांचे शेणही खाल्ले. चिलखत, आदर्श, बोफोर्स अशा सर्वच घोटाळ्यांत त्यांनी भ्रष्टाचाराचा आदर्श उभा केला, अशा शब्दांत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर शरसंधान साधले. अयोध्येत राम मंदिर बांधणारच, अशी ग्वाही देत त्यांनी या मुद्द्याला निवडणुकीच्या निमित्ताने पुढे आणले.

भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी बुधवारी, २४ एप्रिलला सायंकाळी नाशिकमधील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ठाकरे यांनी भुजबळांसह राहुल गांधी आणि शरद पवारांवरही टीका केली. मफलरवाल्यांना त्यांच्या कर्माची फळे भोगावीच लागतील. याच लोकांनी कधीकाळी शिवसेना प्रमुखांना जेलमध्ये पाठवण्यासाठी प्रयत्न केल्याचेही ठाकरे म्हणाले. पंतप्रधान पदासाठी इच्छुकांना अनेक बुडांची आघाडी तयार करावी लागली. ही आघाडी बिन चेहऱ्याची आहे. असा चेहरा देशविकास कसा साधणार, असा सवालही त्यांनी केला.

उद्धव ठाकरे उवाच…

  • काँग्रेस हा विश्वासघातकी पक्ष
  • हिंदुत्ववादी सरकार नको म्हणून विरोधक एकत्र आले
  • काँग्रेसचे पंतप्रधान नरसिंहराव यांनी अतिरेक्यांना बिर्याणी खायला घालून सोडले
  • सैनिकांच्या शौर्याचे आम्ही भांडवल करत नाही. मात्र, विरोधक नको नको त्या शंका उपस्थित करत जवानांचे
  • खच्चीकरण करत आहेत.
  • भारतमातेच्या गळ्याभोवती हिरवा फास आवळला जातोय