घरमहाराष्ट्रनाशिककाँग्रेस प्रायव्हेट कंपनी; राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलेली

काँग्रेस प्रायव्हेट कंपनी; राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलेली

Subscribe

ज्यांनी काँग्रेसची पाठराखण केली नाही ते आता काँग्रेस उभी करायला निघाल्याचा राधाकृष्ण विखे पाटील यांचा आरोप

समन्यायी पाणीवाटप कायद्यास आपला विरोध होता. यासाठी पदाचा राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. मात्र, माजीमंत्री थोरात जलसंपदाचे राज्यमंत्री होते. त्यांनी त्यास विरोध केला नाही. ते आता कृषीमंत्री होतो, असे सांगून खोटे बोलत आहेत. हवे तर त्यांनी साईबाबाच्या डोक्यावर हात ठेवून सांगावे. राज्यात काँग्रेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली असून राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली आहे. जिल्ह्यात ज्यांनी काँग्रेसची पाठराखण केली नाही. ते आता काँग्रेस उभी करायला निघाले असल्याचा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

गुरुवारी (२५ एप्रिल) तालुक्यातील वडाळा महादेव येथे ससाणे समर्थकांची बैठकीत ते बोलत होते. यावेळी बैठकीत
माजी आमदार (स्व.) जयंत ससाणे यांच्या आजारपणाच्या काळात धोका दिल्याने कुठल्याही परिस्थितीत आमदार भाऊसाहेब कांबळे यांचे काम करायचे नाही, असा निर्धार समर्थकांनी केला. करण ससाणे मात्र यावेळी अनुपस्थित होेते. विखे म्हणाले, आपल्यावर पक्ष कधी कारवाई करतो, यासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून आहेत. पाणी, तालुक्याच्या अस्मितेसाठी निर्णायक भुमिका घेवू. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष करण ससाणेदेखील बरोबर राहतील. सर्वांनी या निर्णयासोबत रहावे, असे आवाहन त्यांनी केले. ज्यांनी पाप केले त्यांच्या पदरात माप टाकू, तालुका उध्वस्त करणार्‍यांना त्यांची जागा दाखवून देऊ, ज्यांनी पाणी पळविले त्यांच्यासोबत काम करणार्‍या तसेच, पाटपाण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करणार्‍यांनी त्यांना पाठिंबा दिला. हा निर्णय जनतेच्या तोंडाला पाने पुसण्यासारखा आहे. त्यांनी त्याचा पुनर्विचार करावा, अन्यथा जनता विचार केल्याशिवाय राहणार नाही, असे विखे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचे नाव न घेता म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -