देवळा तालुक्यातून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी सहकार्य अपेक्षित

देवळा तालुका डॉक्टर्स असोसिएशन आणि पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या वतीने आवाहन

Coronavirus
CORONAVIRUS : देवळा तालुक्यात पुन्हा ११ अहवाल पॉझिटिव्ह

देवळा : शहर व तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्य यंत्रणेवर ताण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरिता नागरिकांनी प्रशासनाने घालून दिलेले नियम व अटी शर्तींचे पालन करण्याचे आवाहन देवळा तालुका डॉक्टर्स असोसिएशन आणि पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. कोरोनामुक्त देवळा तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येते असल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर देखील याचा ताण निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांनी काही नियम पाळणे अत्यावश्यक आहेत.

डॉक्टर्स असोसिएशन व आरोग्य विभागाचे आवाहन

प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी समजून घेणे आवश्यक असून घराबाहेर पडतांना न विसरता मास्क किंवा रुमाल वापरणे अत्यावश्यक असतानाही अनेक नागरिक हे पाळत नसल्याने त्याचा परिणाम त्यांच्यासह कुटुंब व आरोग्य यंत्रणेला भोगावा लागत आहे. सुरक्षित अंतराचे महत्व वारंवार सांगूनही ते पाळताना कोणीही दिसत नाही. यामुळे प्रदूषणमुक्त भागातही करोनाचे संक्रमण वाढतच चालले आहे. यामुळे मास्क लावल्याशिवाय घराबाहेर पडणार नाही. मी गर्दीच्या ठिकाणी जाणार नाही. सुरक्षित अंतर ठेवण्याचे भान ठेवेल. ही संकल्पना उराशी बाळगून आपला तालुका पुन्हा लवकरच करोना मुक्त होणे कामी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन देवळा तालुका डॉक्टर्स असोसिएशन व आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.