घरमहाराष्ट्रनाशिकCORONA : सावधान! मास्क न वापरणाऱ्या ७ जणांवर गुन्हे दाखल

CORONA : सावधान! मास्क न वापरणाऱ्या ७ जणांवर गुन्हे दाखल

Subscribe

देवळा पोलिसांची कार्यवाही

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घराबाहेर पडताना लोकांनी तोंडावर मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानंतरही अनेक जण तोंडावर मास्क न लावता आपल्यासह इतरांचे आरोग्य धोक्यात टाकत असून त्यांच्याविरुद्ध देवळा पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून आज दिवसभरात पोलिसांनी ७ जणांविरुद्ध १८८ कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले तसेच १३ जणांविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात आली.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लोकांनी सामाजिक अंतर राखावे व घराबाहेर पडताना नाक, तोंडावर मास्क बांधणे गरजेचे असतांना देखील लोक सदर नियम न पाळता वाहन घेऊन घराबाहेर पडत आहेत. अशा बेजबाबदार लोकांविरुद्ध देवळा पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली असून कारवाईची मोहीम हाती घेतली असून आज दिवभरात देवळा शहरात मास्क न वापरणाऱ्या ७ जणांविरुद्ध १८८ कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले तसेच १३ जणांविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात आली असून अशाप्रकारे मास्क न वापरणाऱ्यावर कार्यवाही केली जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांनी सांगितले.

- Advertisement -

देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास देशमुख,पोलीस उपनिरीक्षक संजय मातोंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी रवींद्र मल्ले,सचिन भामरे,अंकुश हेंबाडे,विजय सोनवणे तसेच होमगार्ड यांनी ही कार्यवाही केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -