CORONAVIRUS : देवळा तालुक्यात पुन्हा ११ अहवाल पॉझिटिव्ह

देवळा शहर, झिरेपिंपळ, दहिवड येथील रुग्णांचा समावेश

Coronavirus
CORONAVIRUS : देवळा तालुक्यात पुन्हा ११ अहवाल पॉझिटिव्ह
Advertisement

देवळा : तालुका प्रशासनाने ६८ संशयितांचे घशाचे स्राव तपासणीसाठी पाठवले होते. नुकतेच सर्व अहवाल प्राप्त झाले असून यातील ११ अहवाल कोरोना पॉझिटिव्ह तर उर्वरित ५७ अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांनी दिली आहे.
रविवारी (दि. १३) प्राप्त झालेल्या पॉझिटिव्ह अहवालांत देवळा शहर, दहिवड, झिरे पिंपळे येथील रुग्णांचा समावेश आहे. जनतेने घाबरून न जाता, योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मांडगे यांनी केले आहे.

गावनिहाय बाधित पुढीलप्रमाणे…

देवळा – ६, (पुरुष-३, महिला-३)
दहिवड – 2, (पुरुष-२)
झिरे पिंपळ-३ (पुरुष -१, महिला-२)