घरताज्या घडामोडीमुलगा हरवल्याची तक्रार मागे घेण्यासाठी ते पोहोचले पोलीस ठाण्यात अन् घडले भलतेच

मुलगा हरवल्याची तक्रार मागे घेण्यासाठी ते पोहोचले पोलीस ठाण्यात अन् घडले भलतेच

Subscribe

मुलगा हरवल्याची तक्रार मागे घेण्यासाठी वडिलांकडून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि.२७) मालेगावातील पवारवाडी पोलीस ठाण्याच्या प्रवेशव्दाराजवळ पोलीस नाईकास अटक केली. चंद्रकांत हरिभाऊ कडनोर असे अटक करण्यात आलेल्या पोलीस नाईकाचे नाव आहे.
मुलगा हरविल्याची तक्रार वडिलांनी मालेगावातील पवारवाडी पोलीस ठाण्यात दाखल केली. तक्रार केल्यानंतर काही दिवसांत मुलगा स्वत:हून परत घरी आला. मुलाच्या भावी आयुष्यात अडचण येवू नये, यासाठी वडिलांनी हरवल्याची तक्रार मागे घेण्याचे ठरविले. त्यासाठी ते पोलीस ठाण्यात गेले. त्यांनी पोलीस नाईक चंद्रकांत हरिभाऊ कडनोर यांना मुलगा घरी आला असून तक्रार बंद करायची असल्याचे सांगितले. मात्र, कडनोर याने तक्रार बंद करण्यासाठी ५ हजार रुपयांची मागणी त्यांच्याकडे केली. याप्रकरणी वडिलांनी लाचलुपत प्रतिबंधक विभाग, नाशिक कार्यालयाकडे तक्रार केली. त्यानुसार पथकाने पडताळणी करत सापळा रचला. पवारवाडी पोलीस ठाण्याच्या प्रवेशव्दाराजवळ तक्रारदाराकडून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पथकाने कडनोर यास अटक केली. याप्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -