घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकच्या कासार दाम्पत्याकडून चीनमध्ये योगाचे धडे

नाशिकच्या कासार दाम्पत्याकडून चीनमध्ये योगाचे धडे

Subscribe

नाशिकचे योगा प्रशिक्षक सोनम कासार व अमोल कासार हे भारतीय दाम्पत्य पाच वर्षापासून चीनमध्ये योग प्रशिक्षणाचे धडे देत आहेत.

राकेश हिरे, कळवण

भारतात योगाला पूर्वापार महत्व प्राप्त असून काही वर्षात भारतीय संस्कृतीचा वारसा योगा जागतिक स्तरापर्यंत पोहोचला आहे. योगाची आवड देशासह विदेशातही झपाट्याने वाढत असल्याने भारतीय योगाशिक्षकांना विदेशात मोठी मागणी आहे. योगा प्रशिक्षक नाशिकचे सोनम कासार व अमोल कासार हे भारतीय दाम्पत्य पाच वर्षापासून चीनमध्ये योग प्रशिक्षणाचे धडे देत आहेत.

- Advertisement -

मुळचे नाशिककर अमोल कासार आणि जिल्ह्यातीलच कळवण माहेर असलेल्या त्यांच्या पत्नी सोनम हे दोघेही योगा प्रशिक्षक असून चीनमध्ये योगा प्रशिक्षण देणार्‍या संस्थेत शिकवतात. अमोल यांचे शिक्षण एमबीए (एचआर) झालेले असून सोनम यांनी डी. एड. केले आहे. दोघांनीही त्र्यंबकेश्वर येथील योगविद्याधाम येथे योगाचे प्रशिक्षण घेतले असून ते चीनमध्ये योगाचे प्रशिक्षक म्हणून गेल्या पाच वर्षापासून कार्यरत आहेत. सुरुवातीला भाषेचा अडसर येत असल्याने दोघांनीही चायनीज भाषा शिकून घेतली असून आता ते उत्तम प्रकारे चायनीज बोलतात. चायनीजमधूनच ते भारतीय योगाचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देत आहेत हे विशेष! चीनमधील पारंपारिक ‘थायची’ हा योगासारखाच प्रकार असला तरी त्यापेक्षा भारतीय योगाची चीनमध्ये सर्वाधिक क्रेझ आहे.

मंत्रांचीही शिकवण

कासार या दाम्पत्याने चीनमध्ये प्रशिक्षणार्थींना संस्कृत मंत्र, सूर्यनमस्काराचे बारामंत्र, गायत्री मंत्र, पतंजली मंत्र हे संस्कृत भाषेतून शिकवले आहे.

- Advertisement -

चायनीज भाषा आत्मसात केली

चीनी लोकांमध्ये योगाविषयी असलेली आवड बघून भारतीय संस्कृतीचा अभिमान वाटतो. दोघेही चायनीज भाषा शिकलो आणि योगाचे प्रशिक्षण देत आहोत. योगाचे विविध प्रकार चीनी लोक शिकून आत्मसात करतात. – सोनम कासार, योग प्रशिक्षिका, चीन.

विदेशात प्रसाराचा आनंद

योगा शिकवताना स्वतःचा तर फायदा होतोच. याशिवाय भारतीय योगाचा प्रसार विदेशात करत असल्याचा आनंदही मिळतो. – अमोल कासार, योगा प्रशिक्षक, चीन.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -