लॉकडाऊनमुळे न्यायालयीन खटल्यांच्या तारखांमध्ये पुन्हा बदल

Nashik

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 31 मार्चपर्यंतच्या कामकाजात कपात करण्यात आली होती. फौजदारी गुन्ह्यांसंदर्भात खटले वगळता अन्य खटल्यांचे कामकाज स्थगित करीत त्यांच्या तारखा पुढे ढकलल्या होत्या. मात्र, देशभर लॉकडाऊन करण्यात आल्याने 15 एप्रिलपर्यंतच्या खटल्याच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर सर्वोच्च, उच्च न्यायालयांसह जिल्हा व सत्र न्यायालयीन खटल्यांचे कामकाज स्थगित करत 31 मार्चपर्यंत अतिमहत्त्वाच्या फौजदारी खटल्यांचे कामकाज करण्याचे आदेश होते. मात्र, देशभर संचारबंदीचे आदेश 14 एप्रिलपर्यंत लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, जिल्हा न्यायालयांनाही 1 ते 15 एप्रिलपर्यंतच्या खटल्याच्या तारखा पुढे ढकलण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार, नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने 1 ते 15 एप्रिल दरम्यानच्या दिवाणी, फौजदारी सुनावणीच्या दिलेल्या तारखांना 13 ते 22 एप्रिल या तारखांना केले जाणार आहे. फौजदारी गुन्ह्यातील पोक्‍सो, एमपीआयडी, लाचलुचपत प्रतिंबंधक, अट्रोसिटी यासह रोजच्या रिमांडचे कामकाज नियमित तीन तासांच्या कामांच्या वेळेत केले जाणार आहे. त्यासाठी 1 ते 15 एप्रिलपर्यंतची जबाबदारी संबंधित सत्र न्यायधीशांवर सोपविण्यात आली आहे. याप्रकरणी आदेश जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रधान न्यायधीश अभय वाघवसे यांनी जारी केले आहेत.

 

अशा आहेत पुढे ढकलेल्या तारखा

सध्याची तारीख पुढील कामकाजाची तारीख

1 एप्रिल    13 एप्रिल

3 एप्रिल 15 एप्रिल

4 एप्रिल 16 एप्रिल

7 एपिल 17 एप्रिल

8 एप्रिल 18 एप्रिल

9 एप्रिल 20 एप्रिल

13 एप्रिल 21 एप्रिल

15 एप्रिल 22 एप्रिल