घरमहाराष्ट्रनाशिकअमित शहा यांच्या हेलिकॉप्टरचे ओझरला लँडिंग

अमित शहा यांच्या हेलिकॉप्टरचे ओझरला लँडिंग

Subscribe

अकोले, जामखेडे येथील प्रचार सभा रद्द

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी परतीच्या पावसाचा उमेदवार व त्यांच्यासाठी सभा घेणार्‍या राजकीय नेत्यांनाही फटका बसला. नंदूरबार येथून अकोले येथे सभेसाठी निघालेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे हेलिकॉप्टरचे खराब हवामानामुळे ओझर विमानतळावर तातडीने उतरवण्यात आले. ओझर येथे दीड तास थांबून वातावरण निवाळल्यानंतर ते शिर्डीकडे रवाना झाले. तेथे गेल्यानंतरही अकोले व जामखेड येथेही पाऊस असल्याने हेलिकॉप्टर जाऊ शकणार नसल्याने दोन्ही सभा रद्द करून ते दिल्लीकडे रवाना झाले.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून राज्यात कालपासून परतीच्या पावसाचे पुन्हा आगमन झाले आहे. प्रचाराच्या सुरुवातीच्या काळात काही ठिकाणी कोसळल्यानंतर पावसाने मधल्याकाळात आठवडाभर उघडीप दिली होती. मात्र, अखेरच्या टप्प्यात पुन्हा पावसाचे आगमन झाले आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अमित शहा यांच्या महाराष्ट्रात नंदुरबार, अकोले व जामखेड येथे प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले होते. नंदुरबार येथील सभा आटोपून अकोल्याकडे जात असताना दुपारुी दोनला खराब हवामानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने त्यांच्या हेलिकॉप्टरचे तातडीने ओझर विमानतळावर लॅण्डिंग करण्यात आले. विमानतळ प्रशासनाने पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांना माहिती देण्यात आली. त्या तातडीने विमानतळावर पोहोचून त्यांना सुरक्षा पुरवण्यात आली. ओझर विमानतळावर अमित शहा दीड थांबले होेते. पाऊस कमी झाल्यानंतर त्यांच्या हेलिकॉप्टरने शिर्डी विमानतळाकडे उड्डाण केले. तेथून त्यांनी अकोले व जामखेड येथील हवामानाची माहिती घेतली असता तेथेही पाऊस असल्यामुळे खराब हवमानामुळे वेळेत पोहोचणे शक्य नसल्याने दोन्ही सभा रद्द करून ते दिल्लीला रवाना झाले.

- Advertisement -

गेले आठ-दहा दिवसांपासून महाराष्ट्रात सभांचा धडाका उडवणारे भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी शेवटच्या दिवशीही तीन प्रचारसभांचे नियोजन केले होेते. मात्र, पाऊस व खराब हवामानामुळे त्यांना दोन सभा रद्द कराव्या लागल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -