परप्रांतीय महिलेचा गळा आवळून खून

पती फरार; सिन्नर येथील घटना

Nashik
teacher molested more than 14 students in navi mumbai
विनयभंग

सिन्नरमधील संजीवनीनगर परिसरात एका परप्रांतीय महिलेचा ओढणीने गळा आवळून खून झाल्याची घटना शनिवारी (दि.21) दुपारी उघडकीस आली. घटनेनंतर पती फरार झाला आहे. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. रेखा दर्वेश मेहरा (21, मूळ रा. भोपाळ, ह. मु. संजीवनीनगर, सिन्नर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. गिरीश शिरसाठ यांच्या मालकीच्या घरात भाड्याने रेखा या पती व 8 वर्षीय मुलीसह पाच दिवसांपासून रहात होत्या. शुक्रवारपासून त्यांचा घराचा दरवाजा बंद होता.

रेखा मेहरा यांची आठ वर्षीय मुलगी शाळेतून आल्यानंतर दरवाजा बंद असल्याने ती शिरसाठांच्या घरी थांबली. रात्री उशिरापर्यंत घराचा दरवाजा न उघडल्याने तिचे आई, वडील बाहेरगावी असावेत, असा अंदाज बांधून शिरसाठांनी मुलीला मेहरांच्या नातेवाईकांकडे सोपवले. शनिवारी दुपारपर्यंत घराचा दरवाजा बाहेरून बंद असल्याने घरमालक शिरसाठ यांचा संशय आला. त्यांनी सिन्नर पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी सरकारी पंचासमक्ष दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता बाथरुममध्ये रेखा मृतावस्थेत आढळून आल्या. पती दर्वेश मेहरा फरार आहे. त्यांचा ओढणीने गळा आवळून खून करण्यात आला असल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले.