घरमहाराष्ट्रनाशिकमहामार्गावर आढळले मृत अर्भक

महामार्गावर आढळले मृत अर्भक

Subscribe

अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई-आग्रा महामार्गावर बॉटेनिकल गार्डनसमोरील दुभाजकाजवळ चार महिन्यांचे स्त्री जातीचे अर्भक १० जुलैला सायंकाळी आढळून आले. याप्रकरणी नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी अर्भकास जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी घोषित केले. याप्रकरणी भालचंद्र मधुकर भोर यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास हवालदार विवेकानंद पाठक करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -