घरमहाराष्ट्रनाशिकवर्षभरात वाहनांनी घेतला ११ बिबट्यांचा बळी

वर्षभरात वाहनांनी घेतला ११ बिबट्यांचा बळी

Subscribe

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१८ च्या कालावधीत नाशिक आणि नगर जिल्ह्यात अकरा बिबट्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. गेल्या २२ दिवसात चार बिबटे अपघातात मृत्युमुखी पडले आहेत. नाशिकमधील महामार्गाजवळ मंगळवारी २२ जानेवारीस बिबट्याचा मृतदेह आढळून आला. वन्यजीवांच्या अधिवास क्षेत्रात माणसाचा अती हस्तक्षेप वेळीच न थांबल्यास येत्या काही वर्षात बिबट्या आणि माणूस यांच्यातील संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत.

वनक्षेत्र कमी होत असल्याने चपळाईने शिकार करणार्‍या बिबट्याचा रहिवास बदलला आहे. झाडांच्या जंगलातून तो सिमेंटच्या जंगलात येतो खरे. मात्र, येथील वाहने त्याच्या जीवावर उठतात. वन विभागातून मिळालेल्या माहितीनुसार १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१८ च्या कालावधीत नाशिक आणि नगर जिल्ह्यात अकरा बिबट्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. गेल्या २२ दिवसात चार बिबटे अपघातात मृत्युमुखी पडले आहेत. नाशिकमधील महामार्गाजवळ मंगळवारी २२ जानेवारीस बिबट्याचा मृतदेह आढळून आला. वन्यजीवांच्या अधिवास क्षेत्रात माणसाचा अती हस्तक्षेप वेळीच न थांबल्यास येत्या काही वर्षात बिबट्या आणि माणूस यांच्यातील संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत.

वनक्षेत्रातील अडचणींमुळे बिबट्याने आपला रहिवासच बदलला आहे. त्यामुळे आता जंगलात बिबट्या सापडणे मुश्किल झाले आहे. सद्यस्थितीत उसाच्या शेतात बिबट्याचा रहिवास प्रामुख्याने आढळतो. उसात सहजपणे लपता येत असल्याने बिबट्यांकडून याच शेताला पसंती दिली जाते. ऊस कापणीच्या वेळी शेतात बछडे आढळल्याची घटना नाशिक आणि नगरमध्ये वारंवार घडत आहेत. उसाच्या क्षेत्रामुळे नाशिक आणि नगर या दोन्ही जिल्ह्यात बिबट्यांचा सर्वाधिक अधिवास आढळतो.

- Advertisement -

विकेण्डने बिबटे त्रस्त

निसर्गरम्य परिसराची भुरळ पडल्याने फार्म हाऊसच्या नावाखाली नाशिकच्या वनक्षेत्राजवळ चराऊ जमिनी आणि कड्या-कपार्‍यांवर वस्त्या वाढू लागल्या आहेत. जमीन सपाटीकरणासाठी जेसीबींची घरघरही वाढली आहे. रस्त्यांच्या सोयीमुळे वाहनांचे ताफेच्या ताफे विकएन्डच्या निमित्ताने या भागात घिरट्या घालतात. अशा रीतीने विरळ जंगल आणि विशेषत: डोंगर कपार्‍या या बिबट्याच्या अधिवास क्षेत्रात मानवी हस्तक्षेप वाढल्याने त्याने वैयक्तिक सुरक्षा व अन्नाच्या शोधात जवळच्या नागरी वस्त्यांना लक्ष्य केल्याचे सांगण्यात येते.

- Advertisement -

जखमी बिबट्यांना माणिकडोहचा आधार

जखमी अवस्थेत बिबट्या आढळल्यास त्याला पुणे जुन्नर परिसरातील माणिकडोह बिबट्या निवाराकेंद्रात उपचारासाठी ठेवले जाते. मात्र अधिक काळ या ठिकाणी त्याच्यावर उपचार केल्यास बिबट्या परावलंबी होतो. त्यानंतर मात्र जंगलात तो शिकार करू शकत नाही. त्यामुळे त्याला लवकरात लवकर जंगलात सोडणेच सयुक्तिक ठरते, असे अधिकार्‍यांनी सांगितले.

का येतो नागरी वस्तीत बिबट्या

  • जंगलात वृक्षतोडीचे प्रमाण वाढले. त्यामुळे वस्तीकडे धाव
  • जंगलात प्राण्यांचे आणि पाण्याचे दुर्भिक्ष्य
  • प्राण्यांची चोरटी शिकार
  • भक्ष्यांचेे प्रमाण कमी झाल्याने जाणवणारी खाद्यटंचाई
  • जंगलतोड, त्यातून प्राण्यांचा उद्ध्वस्त होणारा निवारा
  • डोंगर कपारीच्या तुलनेत मानवी वस्तीत भक्ष्य आणि पाणी उपलब्ध होणे
  •  उसाचे शेत मादी बिबट्याला प्रजाननासाठी सुरक्षित ठरणे

हद्दीच्या वादावरून बिबट्याचा मृत्यू

अहमदनगरमध्ये अधिवास हद्दीच्या वादावरून दोन बिबट्यांत गेल्या वर्षी जोरदार मारामारी झाली होती. त्यात एका बिबट्याचा जागीच मृत्यू झाला होता.

बिबट्यांची तुलनात्मक संख्या

जिल्हा      २०१२        २०१८
नाशिक      ६०           ८०
नगर         ८०          १००

आमचाही नाईलाज

बिबट्यांचा मृत्यू टाळण्यासाठी वनविभागाच्यावतीने नेहमीच प्रयत्न केले जातात; परंतु अपघाती मृत्यूला आमचाही नाईलाज असतो. बिबट्या दिसल्यावर होणारी गर्दीदेखील परिस्थिती आटोक्याबाहेर जाण्याचे मुख्य कारण ठरते. अशा परिस्थितीत वनविभागाच्या कर्मचार्‍यांना काम करू द्यावे. – रवींद्र भोगे, वनपरीक्षेत्र अधिकारी

वर्षभरात वाहनांनी घेतला ११ बिबट्यांचा बळी
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -