घरमहाराष्ट्रनाशिकपरराज्यातील भाविकांच्या कारचा अपघात; एक ठार, १० जखमी

परराज्यातील भाविकांच्या कारचा अपघात; एक ठार, १० जखमी

Subscribe

त्र्यंबकेश्वर येथून दर्शन घेऊन नाशिककडे येत असलेल्या परराज्यातील भाविकांच्या कारला रविवारी, २३ जूनला अपघात होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात १० भाविक गंभीर जखमी झाले.

त्र्यंबकेश्वर येथून दर्शन घेऊन नाशिककडे येत असलेल्या परराज्यातील भाविकांच्या कारला रविवारी, २३ जूनला अपघात होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात १० भाविक गंभीर जखमी झाले.

अंजनेरीनजीक पाठीमागून आलेल्या भरधाव कारने (एमएच १५, जीएल ५७५७) भाविकांच्या कारला (टीएन-०७, यूएफ ४२२८) जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एकजण जागीच ठार झाला असून सुमारे १० भाविक गंभीर जखमी झाले. धडक देणार्‍या कारने तीन पलट्या घेतल्या. त्यानंतर कारची एअर बॅग्स उघडल्याने त्या कारमधील प्रवाशी बचावले. भाविक शिर्डीवरून त्र्यंबकेश्वर दर्शन करून नाशिककडे येत होते. जखमींना नाशिक शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्र्यंबकेश्वर पोलिसांकडून अपघाताची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -