घरक्राइममस्करीची झाली कुस्करी; गुदव्दारात हवा भरल्याने तरुणाचा मृत्यू

मस्करीची झाली कुस्करी; गुदव्दारात हवा भरल्याने तरुणाचा मृत्यू

Subscribe

चेष्टा मस्करीत गुदव्दारात हवा भरल्याने ३० वर्षीय रोजंदारीवर काम करणार्‍या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना त्र्यंबकेश्वरमध्ये घडली. याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबादास लहू कुटे (रा.देवडोंगरी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

ठानापाडा (ता.त्र्यंबकेश्वर) जवळील तळवाडे शिवारात अशोका इस्टेट डेव्हलपर प्रा. लि. कंपनीचा कृषी उद्योग सुमारे दीडशे एकरावर आहे. या ठिकाणी फळझाडे आणि त्या फळांपासून पेय आणि खाद्य पाकिटे बनविली जातात. शेतातील कामासाठी देवडोंगरी पाड्यावरील सात ते आठजण कंत्राटी पद्धतीने सव्वा महिन्यापासून आले होते. सर्वजण शेतात फांद्या वेचणे व काजूगर निवडणे आणि साफ करण्याचे काम करीत होते. २८ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जेवणाच्या सुट्टीत संशयित गोपाळ टोपले, बबलु घुटे, दिलीप पवार, रमेश पवार यांनी काजूच्या स्वच्छतेसाठी असलेल्या हवेच्या कॉम्प्रेसरच्या नळीने अंबादास कुटे याच्या गुदव्दारात हवा भरली. त्याला त्रास सुरु झाल्याने कामगारांनी उपचारार्थ त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्यास पुढील उपचारार्थ नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, त्याचा मृत्यू झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -