घरमहाराष्ट्रनाशिकभुजबळ, गोडसे, कोकाटेंच्या खर्चात लाखोंची तफावत

भुजबळ, गोडसे, कोकाटेंच्या खर्चात लाखोंची तफावत

Subscribe

नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार समीर भुजबळ, हेमंत गोडसे व माणिक कोकाटे या तिघा उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चांमध्ये लाखो रुपयांची तफावत निवडणूक शाखेच्या निदर्शनास आली.

नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार समीर भुजबळ, हेमंत गोडसे व माणिक कोकाटे या तिघा उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चांमध्ये लाखो रुपयांची तफावत निवडणूक शाखेच्या निदर्शनास आली. खर्च निरीक्षकांनी निश्चित केलेल्या खर्चापेक्षा कमी खर्च उमेदवारांनी नमूद केल्याने यावर हरकत घेण्यात आली असून या उमेदवारांना दुसर्‍यांदा नोटीस बजावण्यात आली आहे.

नाशिक व दिंडोरी मतदारसंघासाठी येत्या सोमवारी (दि. २३) मतदान पार पडणार आहे. अखेरच्या टप्यात उमेदवारांनी प्रचारावर भर दिला आहे. दरम्यान एकीकडे प्रचाराची धुरा सांभाळत असतानाच दुसरीकडे निवडणूक शाखेकडे उमेदवारांनी दुसर्‍या टप्यातील त्यांच्या निवडणूक खर्चाचे सादरीकरण केले; परंतु उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चाचा तसेच भरारी पथकांनी उमेदवारांच्या खर्चाचा सादर केलेल्या आकडेवारीचा प्रशासनाने ताळमेळ केला. या ताळमेळामध्ये तिन्ही उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चात लाखो रुपयांची तफावत असल्याचे आढळून आले आहे. निवडणूक शाखेने अपक्ष उमेदवार माणिक कोकाटे यांचा खर्च २२ लाख ९६ हजार ४०४ रुपये निश्चित केला आहे. कोकाटे यांनी स्वत: ३ लाख २७ हजार ७७९ रुपये खर्च दाखवला आहे. निवडणूक शाखेने निश्चित केलेला खर्च आणि कोकाटेंनी दिलेला अहवाल बघता १९ लाख ६८ हजेर ६२५ रुपयांची तफावत आढळून आली आहे. आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांचा खर्च २६ लाख ७० हजोर ५५८ रुपये निश्चित करण्यात आला असताना त्यांनी १७ लाख ५९ हजार ८०४ रुपये खर्च सादर केला आहे. परिणामी खर्चाची तफावत ९ लाख १० हजार ७५४ रुपये आढळून आली आहे. दरम्यान, युतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी दुसर्‍या टप्यातील खर्च सादर करतेवेळी अनुपस्थित होते. मात्र, त्यांच्या खर्चात १० लाख ३५ हजार ४०२ रुपयांची तफावत निदर्शनास आल्याची माहिती निवडणूक शाखेने दिली आहे.

- Advertisement -

इतर उमेदवारांचा खर्च

वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार यांनी १ लाख ७८ हजार ९२७ रूपये खर्च सादर केला आहे. विनोद शिरसाट ३१ हजार ८२८, धनंजय भावसार २६ हजार ४००, प्रकाश कनोजे २९ हजार ९६१, सुधीर देशमूख ५६ हजार३५०, देविदास सरकटे १३ हजार ५००, विलास देसले १ लाख ५० हजार ७२३, वैभव आहिरे ४३ हजार ४६०, प्रियांका शिरोळे २६ हजार ५४०, सोनिया जावळे १९ हजार ३२५, शरद अहिरे २३ हजार ६५५, संजय घोडके ३८ हजार ४२८, शिवनाथ कासार २५ हजार ८६०, तर सिंधूबाई केदार यांनी २८ हजार ६५० रुपयांचा खर्च सादर केला. शरद धनराव हे खर्च सादरीकरणावेळी गैरहजर राहिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -