घरमहाराष्ट्रनाशिकठेवी, वसुलीच्या नादात जिल्हा बँकेची कोंडी

ठेवी, वसुलीच्या नादात जिल्हा बँकेची कोंडी

Subscribe

पतसंस्था फेडरेशनचे 310 कोटी रुपये अडकले; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कर्ज वसूलीस विरोध

आर्थिक अडचणींचा सामना करत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमुळे डबघाईस आलेल्या पतसंस्थांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून, ठेवी परत मिळवण्यासाठी सोमवारी (दि. १५) बँकेसमोर धरणे आंदोलन केले. विशेष म्हणजे पतसंस्थांचे हे आंदोलन सुरु असतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बँकेच्या प्रवेशव्दारावर ठिय्या मांडत कर्जवसूलीस विरोध केला. त्यामुळे एकीकडे ठेवी मिळवण्यासाठी तर दुसरीकडे वसुली थांबविण्यासाठी आंदोलन झाल्याने जिल्हा बँकेची आर्थिक कोंडी झाल्याचे दिसले.

पतसंस्थांच्या ठेवी परत करा

जिल्ह्यातील नागरी-बिगर शेती पतसंस्थांचे 310 कोटी रूपये जिल्हा बँकेत अडकले आहेत. त्यामुळे पतसंस्था आता डबघाईस जाण्याची वेळ आली असून, ठेवी परत मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन व नाशिक विभागीय पतसंस्था फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा बँकेच्या जुन्या इमारतीबाहेर जोरदार घोषणाबाजी करत धरणे आंदोलन केले. ’आमचे पैसे मिळालेच पाहिजे, पैसे आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे’ अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. जिल्हा बँकेनी 15 ऑगस्टपर्यंत ठेवी परत करण्याचे आश्वासन दिले; मात्र, तोपर्यंत पतसंस्थांनी करायचे काय? असा प्रश्न महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांनी उपस्थित केला. पतसंस्थांना वेळीच ठेवी परत न मिळाल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलना इशारा विभागीय फेडरेशनचे कार्याध्यक्ष गोपाळ पाटील यांनी दिला. दरम्यान, पतसंस्थांच्या शिष्टमंडळास विभागीय सहनिबंधक ज्योती लाटकर यांनी बोलावून घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी वसंत लोढा, अ‍ॅड. अंजली पाटील, मधुकर भालेराव, नंदकुमार खैरणार, नरेंद्र बागडे, दिलीप गोगड, प्रकाश गवळी, निशिगंधाताई मोगल, अनिल कोठुळे, मंजुषा दराडे, अनघा फेगडे, अजय वारके, किशोर गुजराथी, अनिल साळवे, राजेश दराडे, सुनील कुलकर्णी, भावना पाठक, एस. टी. आहिरे आदी उपस्थित होते.

- Advertisement -

सक्तीची कर्जवसुली थांबवा

जिल्हा बँकेच्या सक्तीच्या वसुली विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने बँकेच्या प्रवेशव्दारावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. ‘सक्तीची वसुली थांबवा, खरीपाला कर्ज पुरवठा करा, बेकायदेशीर शेती लिलाव थांबवा’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. आक्रमक झालेल्या शेतकर्‍यांना बँकेच्या पायर्‍यावर ठिय्या मांडला. दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांकडून वसुली करून त्यांची पिळवणूक केली जात असल्याचे आरोप संघटनेचे हंसराज वडघुले यांनी केला. तसेच प्रशासकीय पातळीवरील शेतकर्‍यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी विभागीय सहनिबंधक कार्यालयात आंदोलन केले. यावेळी गजानन घोटेकर, नाना बच्छाव, नितीन रोठे, नितीन कोरडे, राजेंद्र खुटे, सुधाकर मोगल, राम निकम, प्रकाश चव्हाण, संजय पाटोळे, कुबेर जाधव, अझर मनियार, राम जगताप, सुखदेव जगताप, पंढरीनाथ जगताप, शाम जगताप, अकुंश जगताप, समाधान जगताप आदी सहभागी झाले होते.

प्रमुख मागण्या

  • जिल्हा बँकेने सक्तीची कर्जवसुली त्वरीत थांबवावी
  • बड्या थकबाकीदारांचे कर्ज अगोदर वसूल करा
  • परस्पर वर्ग केलेले कर्जमाफीचे पैसे परत करा
  • पीककर्ज तातडीने मिळाले पाहिजे
  • कांदा अनुदानाचे त्वरीत वाटप झालेच पाहिजे
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -