घरमहाराष्ट्रनाशिकऔरंगाबादला जाणार्‍या गाड्यांच्या फेर्‍या विस्कळीतच..

औरंगाबादला जाणार्‍या गाड्यांच्या फेर्‍या विस्कळीतच..

Subscribe

चांदोरी चौफुलीवर संपर्क तुटल्याने गाड्या बंद;

गोदावरीला नदीला पूर आल्यानंतर चांदोरी येथे नाशिक-औरंगाबाद मार्गावर पाणी आल्याने हा मार्ग बंद झाला होता. त्यामुळे गाड्यांना चांदोरीहून पिंपळगाव बसंवत मार्गे वळविण्यात आले होते. काल सोमवारी दिवसभर आणि मंगळवारी(दि.6) दूपारपर्यंत औरंगाबादला नाशिकहून गाड्या सुटलेल्या नव्हत्या. त्याचा मनस्ताप प्रवासांना सोसावा लागला होता.

नाशिकहून ठक्करबाजार मध्यवर्ती बसस्थानकातून औरंगाबादकडे गाड्या रवाना होतात. या लांबपल्ल्यांच्या गाड्या रविवारी सोडण्यात आलेल्या दर एक तासाला एक गाडी प्रमाणे फेरी सूरू होती. जोरदार पावसात शिवशाही आणि परिवर्तन गाड्या औरंगाबाद नाक्याहून पुढे चेहेडी पासून पुढे गेल्यानंतर चांदोरी येथे सायखेडा चौफुलीवर गोदावरीच्या पुलाचे पाणी आलेले होते. त्यात नाशिक-औरंगाबाद राज्यमार्ग पाण्यात गेलेला होता. यामुळे एसटीच्या गाड्यांना पुढे मार्गक्रमण करता येत नव्हते. एवढेच नव्हे तर औरंगाबादहून येणार्‍या गाड्यांनाही नाशिककडे मार्गक्रमण करता येत नव्हते. एसटीच्या वाहतुक विभागाने या गाड्यांना पिंपळगाव मार्गे वळविण्यात आले होते. ज्या गाड्या मार्गावर होत्या. त्यांच्या फेर्‍या पूर्ण करून त्यांना नाशिकच्या मुक्कामस्थळी आगारात थांबविण्यात आलेले होते. त्याचबरोबर नंतरच्या फेर्‍या रद्द करण्यात आलेल्या होत्या.सोमवारच्या फेर्‍या पूर्ण बंद करण्यात आलेल्या होत्या. सोमवारी सायंकाळी पावसाचा जोर ओसरलेला होता. तरी चांदोरी चौफुली येथील पुराचे पाणी ओसलेले नव्हते. त्यामुळे एसटीने या मार्गावरून गाड्या सोडलेल्या नव्हत्या. आज सकाळी पूरस्थिती आणि नाशिक-औरंगाबाद मार्ग मोकळा झाला किंवा नाही, याची माहिती घेऊन आगार क्रमांक एकमधून गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात येत होते.

- Advertisement -

बसगाड्या दूपारनंतर सुरू होण्याची शक्यता

नाशिकहून औरंगाबादकडे गाड्या सोडविण्यासाठी दूपारनंतर आगार क्रमांक एकमध्ये नियोजन करण्यात येत होते. त्यामुळे आज गाड्यांच्या फेर्‍या पूर्वरत होतील, असे एसटीच्या वाहतूक विभागाच्या सुत्रांनी महिती देताना सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -