घरमहाराष्ट्रनाशिकराष्ट्रवादी उमेदवाराच्या प्रचारात पैशांचा पाऊस

राष्ट्रवादी उमेदवाराच्या प्रचारात पैशांचा पाऊस

Subscribe

पैसे वाटप करणे दोघांना पडले महागात, निवडणूक शाखेच्या भरारी पथकाची कारवाई, सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

एकीकडे अवकाळी पाऊसाने हजेरी लावली असताना दुसरीकडे मात्र विधानसभेच्या प्रचारात पैशांचा पाऊस पडल्याचे दिसून आले. सातपूर-सिडको या नाशिक पश्चिम मतदारासंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अपुर्व हिरे यांच्या प्रचारात मतदारांना प्रलोभन देत पैसे वाटप करण्याचा प्रकार समोर आला आहे. प्रचारात पैसे वाटप करणे दोघांना चांगलेच महागात पडले आहे. यातील एक शिक्षण क्षेञात कामाला असून एक खासगी व्यवसाय करत आहे. निवडणूक शाखेच्या भरारी पथकाने शनिवारी दुपारी त्या दोघांना रंगेहाथ पकडले असून सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सातपूर पोलिसांनी दिलेली माहीती अशी की, ऋषी विद्यालयातील कर्मचारी जितेंद्रसिंग वजेसिंग पुंजू पवार व श्रमिकनगर, राधाकृष्णनगर येथील अनिल बळीराम शेवाळे हे दोघे शनिवारी दुपारी अशोकनगर येथील एसबीआय बँकच्या परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अपुर्व हिरे यांचा प्रचार करत होते. प्रचार साहित्याबरोबरच त्यांच्याकडे रोख रक्कम असून ते मतदारांना प्रलोभन देत पैसे वाटप करत असल्याची माहिती पश्चिम विधानसभेतील निवडणूक शाखेच्या भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार भरारी पथक क्रमांक ४ चे प्रमुख व कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. राष्ट्रवादीचा प्रचार करणारे पवार व शेवाळे यांना भरारी पथकाने ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांच्याकडे राष्ट्रवादीच्या प्रचार साहित्यासोबत एका पिशवीत २४ हजार ५० रुपये आढळून आले. त्यांच्याविरुद्ध भादंवी कलम १७१ (ब) व १७१ (इ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सातपूर पोलिस करत आहे.

- Advertisement -

दरम्यान, शनिवारी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. दोन दिवसांनी मतदान असल्याने गुप्त प्रचाराला जोर येणार असून पैशांचा महापूर येणार असल्याच्या प्रतिक्रीया सर्वसामान्यांमधून उमटत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -