घरमहाराष्ट्रनाशिकआयोगाचे आदेश धुडकावत खासगी शिक्षकांना जुंपले निवडणूक कामाला

आयोगाचे आदेश धुडकावत खासगी शिक्षकांना जुंपले निवडणूक कामाला

Subscribe

सरकारी व खासगी शिक्षण संस्थांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा निवडणूक प्रचारासाठी वापर करून घेता येणार नाही, असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी बैठकीत जाहीर करूनही प्रत्यक्षात या शिक्षकांना निवडणूक कामासाठी जुंपण्यात आल्याचे उघड झाले आहे.

सरकारी, अनुदानित व विनाअनुदानित खासगी शिक्षण संस्था शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, जिल्हा परिषद, पालिकांचे शिक्षक यांचा वापर निवडणूक प्रचारासाठी करता येणार नाही, असे निर्देश निवडणूक आयोगाने दिलेले आहेत. त्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांनी नगर लोकसभा मतदारसंघात शिक्षकांचा कोणीही प्रचारासाठी वापर करू नये, असे निर्देश दिले होते. तसे आढळल्यास संबंधित शिक्षण संस्थांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता. मात्र, नगरमध्ये अनेक खासगी शिक्षण संस्थांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा वापर निवडणूक प्रचारासाठी केला जात आहे. तसेच प्रचाराचे नियोजन, इतर बाबतीतही त्यांचा सक्रीय सहभाग दिसून येत आहे. असे असतानाही निवडणूक यंत्रणा केवळ बघ्याच्या भूमिकेत आहे. कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. त्यामुळे हा विषय आता चांगलाच चर्चेचा ठरला आहे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -