नाशिक शहरात चोरट्यांची दिवाळी

(फोटो प्रातिनिधिक आहे)

दिवाळी खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये ग्राहमांची हाऊसफूल गर्दी होवू लागली. गर्दीचा फायदा घेण्यासाठी चोरटे सक्रिय झाले असल्याचे नाशिकमधील मुख्य बाजारपेठेत झालेल्या चोरीवरुन समोर आले आहे. दामोदर थिएटरसमोरी आशा गारमेट्स येथे कपडे खरेदी करताना चोरट्याने महिलेची लंपास करत मंगळसूत्र, रोकड, घराच्या चाव्या लंपास केल्या. याप्रकरणी श्रमिकनगर, सातपूर येथील भारती अनिल मेतकर यांनी तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती मेतकर दिवाळीनिमित्त कपडे खरेदीसाठी दामोदर थिएटरसमोरील आशा गारमेंट्स येथे आल्या होत्या. त्यावेळी ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. भारती मेतकर यांनी हातातील पिशवीमध्ये पर्स ठेवली होती. त्या पर्समध्ये मंगळसूत्र, आठ रुपयांची रोकड आणि घराच्या चाव्या असा एकूण ४३ हजारांचा मुद्देमाल ठेवला होता. गर्दीचा फायदा घेत चोरट्याने ती पर्स लंपास केली. मेतकर यांनी पिशवीत पर्समध्ये शोधली असता ती आढळून आली. त्यातून चोरट्याने पर्स लंपास केल्याचे त्यांच्या लक्षात आले. पुढील तपास पोलीस नाईक गवारे करत आहेत.