घरमहाराष्ट्रनाशिकरामनवमी काळात साईबाबांच्या झोळीत चार कोटींचे दान

रामनवमी काळात साईबाबांच्या झोळीत चार कोटींचे दान

Subscribe

श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था आयोजित रामनवमी उत्सवामध्ये ४ कोटी १६ लाख रूपयांची देणगी

श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था आयोजित रामनवमी उत्सवामध्ये ४ कोटी १६ लाख रूपयांची देणगी मिळल्याची माहिती संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.

रोख स्वरुपात ४ कोटी १६ लाख देणगी प्राप्त झाली असून यामध्ये दक्षिणापेटी मोजणी १ कोटी ९२ लाख ७६ हजार ५२७, देणगी काऊंटर ९८ लाख २० हजार ७७४, डेबीट क्रेडीट कार्ड, ऑनलाईन, चेक, डीडी, मनी ऑर्डर आदींतून १ कोटी ११ लाख ५८ हजार ९७८, सोने १९८. ४०० ग्रॅम रक्कम ७. ६१ लाख व चांदी ४१०२. ६० ग्रॅम रक्कम १.११ लाख, १४ देशांचे परकीय चलन अंदाजे ४ लाख ९० हजार ८६० रूपये यांचा समावेश आहे. उत्सवात १ लाख ८० हजार ६७० साईभक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला. यामध्ये टाइम बेस, जनसंपर्क कार्यालय व ऑनलाईन सेवांचा सामावेश असून ऑनलाईन व सशुल्क दर्शन, आरती पासेसव्दारे ६७ लाख ६१ हजार ४०० रुपये प्राप्त झाले.

- Advertisement -

श्री साईप्रसादालयामध्ये १ लाख ९४ हजार ५२७ भक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला. दर्शन रांगेत १ लाख ९५ हजार ४०० साईभक्तांना मोफत बुंदी प्रसाद पाकीटांचे वाटप होऊन २ लाख १६ हजार ८०० प्रसादरुपी लाडू पाकीटांची विक्री झाली. तसेच साईप्रसाद निवासस्थान, साईबाबा भक्तनिवासस्थान, व्दारावती निवासस्थान, साईआश्रम भक्तनिवास व साईधर्मशाळा येथे ४५ हजार ८३३ साईभक्तांची व्यवस्था केली. याप्रसंगी मुख्यलेखाधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी बाबासाहेब घोरपडे व प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -