Video | वाढीव आरक्षणासाठी वंजारी समाजाचा एल्गार

हजारोंच्या संख्येने मोर्चा काढत ‘एनटी’तील वर्गवारी रद्द करण्याची मागणी

Nashik

वंजारी एकजुटीचा विजय असो, वाढीव आरक्षण मिळालेच पाहिजे, एकच मिशन वंजारी आरक्षण, अशा घोषणा देत बुधवारी क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या प्रांगणातून निघालेल्या हजारोंच्या मोर्चाने भटक्या जमातींमधील वर्गवारी रद्द करण्याची मागणी केली.

डोक्यावर मी वंजारी, वाढीव आरक्षण असे लिहिलेल्या टोप्या, हातात मागण्यांचे फलक व वारकरी झेंडा घेऊन कार्यकर्ते मैदानात स्थानापन्न झाले. मोर्चेकर्‍यांच्या हातातील भगव्या झेंड्यांमुळे परिसर भगवामय झाला होता. सरकारने मागणी मान्य न केल्यास १२ डिसेंबरला प्रत्येक तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी प्रतिनिधींनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले.


हे देखील वाचा – राजकीय मॅरेथॉन.. है किसमे दम!


क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक वंजारी आरक्षण कृती समितीतर्फे महिनाभरापासून वंजारी समाजाला वाढीव आरक्षण मिळावे या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यात गावोगावी जागृती करण्यात आली होती. बुधवारी (दि.११) सकाळी अकरापासून क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या आवारात जिल्हाभरातून वंजारी समाजबांधव जमा होऊ लागले. भगवा झेंडा हाती घेऊन तरुण गटागटाने घोषणाबाजी करीत असल्यामुळे परिसर दणाणून गेला होता. सुरुवातीला वंजारी समाजातील शाळकरी मुली व युवतींनी वंजारी समाजाला वाढीव आरक्षणाची गरज का आहे, याबाबत भूमिका मांडली. आवेशपूर्ण केलेल्या भाषणांमधून अनुष्का घुगे, अनुजा कुटे, गायत्री बोडके, उज्वला गायकवाड, पौर्णिमा बोडके आदींनी वंजारी समाजातील विद्यार्थी-तरुणांना कमी आरक्षणामुळे संधी नाकारल्या जात असल्याचे सांगितले.

धनगर समाजाप्रमाणे आरक्षण देण्याची वंजारी समाजाची मागणी

धनगर समाजाप्रमाणे आरक्षण देण्याची वंजारी समाजाची मागणी

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 11, 2019

असा होता मोर्चाचा मार्ग

क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या प्रागंणात सकाळी 11 वाजता समाजबांधव एकत्र झाले. महाविद्यालयाच्या प्रांगणात जमा झालेल्या समुदायास पाच कन्या मोर्चाची पार्श्वभूमी विशद केले. त्यानंतर, 12:30 वाजता नाईक महाविद्यालयापासून मोर्चाला सुरूवात झाली. सर्वात पुढे भजनी मंडळ, त्यानंतर विद्यार्थी महिला त्यानंतर विविध ठिकाणांहून आलेले ग्रामस्थ समाजबांधव सहभागी झालेले होते. कॅनडा कॉर्नर, राजीव गांधी भवन, पंडीत कॉलनी मार्गे गंगापूर रोडमार्गे मोर्चा डोंगरे वसतिगृहाच्या मैदानावर आला. मोर्चाच्यावतीने पाच जणांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना निवेदन दिले.

या आहेत समाजाच्या मागण्या

1) जातनिहाय जगगणना करावी.
2) लोकसंख्येच्या प्रमाणात वाढीव 10 टक्के आरक्षण द्यावे.
3) उद्योग-व्यवसायासाठी शासनाने बिनव्याजी कर्ज उपलब्ध करावे
4) विद्यार्थ्यांसाठी जिल्हानिहाय शासकीय वसतीगृहाची उभारणी करावी
5) (स्व.) गोपीनाथ मुंडे महामंडळाची स्थापना करावी.
6) वंजारी समाज भवनासाठी मुंबईत जागा उपलब्ध करावी
7) समाजातील विद्यार्थ्यासाठी आश्रमशाळेतील भत्यामध्ये वाढ करावी
8) एनटी ड भटक्या जमातीसाठी असलेली नॉनिक्रमिलिएरची अट रद्द करावी.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here