घरमहाराष्ट्रनाशिकअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ९४ व्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ९४ व्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर

Subscribe

शहरात होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ तथा विज्ञान कथालेखक ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयंत नारळीकर यांची बहुमताने निवड करण्यात आली. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. २६, २७ आणि २८ मार्च रोजी नाशिकमधील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात साहित्य संमेलन होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ठाले-पाटील म्हणाले, लोकहितवादी मंडळाने दिलेले निमंत्रण साहित्य मंडळाने स्वीकारले. ३१ मार्चपूर्वी साहित्य संमेलन आयोजित करावे लागणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यास त्यांनी होकार देत कामास सुरुवात केली. साहित्य संमेलनासाठी गोखले एज्युकेशन सोसायटीचे प्रांगण अनुकूल आहे. उपसमित्यांनी संमेलनाच्या तीन दिवसीय कार्यक्रमाची रुपरेषा तयार केली होती. कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष डॉ. काळुंखे यांनी ती रुपरेषा रविवारी (दि.२४) साहित्य महामंडळाच्या बैठकीत मांडली. त्या रुपरेषेमध्ये किरकोळ फेरबदल करत मान्य करण्यात आली आहे. तीन दिवसीय कार्यक्रमात लेखक, कवी, कलावंत यांची निवड केली आहे.

- Advertisement -

यावेळी मराठी साहित्य महामंडळाचे उपाध्यक्ष कपूर वासनिक, कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुंखे, जयप्रकाश जातेगाव, संजय करंजकर, प्रा. शंकर बोर्‍हाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -