घरताज्या घडामोडीलॉकडाऊनवर चार ड्रोन कॅमेऱ्याने करडी नजर

लॉकडाऊनवर चार ड्रोन कॅमेऱ्याने करडी नजर

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील लॉकडाऊनवर चार ड्रोन कॅमेऱ्याने करडी नजर ठेवली जात आहे. होम क्वारंटाइन करण्यात आलेल्या लोकांवर व्हिडीओ कॉलद्वारे नजर ठेवली जात आहे. अफवा पसरविणाऱ्या 5 नागरिकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींना दिली.

नांगरे- पाटील म्हणाले,  नागरिकांनी शिस्त पाळावी,  प्रशासनाला सहकार्य करावे, सोशल डिस्टन्स ठेवावा.  पोलिसांचे मनोबल वाढविण्यासाठी सविस्तर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पोलिसांना तीन शिप दिल्या आहेत. करोना सेल, कंट्रोल सेल, कॉल सेंटर आणि नाकाबंदी या ठिकाणी ड्युटी लावण्यात आली आहे. पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. चांगली कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना दररोज बक्षिसे दिली जात आहेत. भाजी बाजारातही गर्दी रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे

- Advertisement -

शहरात 86 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून त्यात वाढ करण्यात आली आहे. मुंबई आणि ठाणे येथून ट्रक, कंटेनरने आपापल्या गावी जाणाऱ्या 728 परप्रांतीय कामगारांना शहरात पाच ठिकाणी आश्रयस्थळी ठेवण्यात आले आहे. त्यांना जेवण दिले जात आहे.

16 जणांना होम क्वारंटाईन

- Advertisement -

दिल्लीतील निजामउद्दीन परिसरात तबलीग जमातच्या मेळाव्यास नाशिक शहरातून गेलल्या 16 लोकांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -