घरमहाराष्ट्रनाशिकपोर्टलद्वारे शिक्षक नियुक्तीस संस्थाचालकांचा विरोध

पोर्टलद्वारे शिक्षक नियुक्तीस संस्थाचालकांचा विरोध

Subscribe

राज्यातील खासगी शिक्षण संस्थांमधील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक भरतीला राज्य सरकारने हिरवा कंदिल दाखवताच त्याविषयी संस्था चालकांमध्ये तीव्र मतभेद उमटले आहेत. वर्षानुवर्षे तुटपुंज्या मानधनावर काम करणार्‍या शिक्षकांना डावलत पवित्र पोर्टलच्या आधारे थेट नियुक्ती करण्यात येणार आहे.

राज्यातील खासगी शिक्षण संस्थांमधील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक भरतीला राज्य सरकारने हिरवा कंदिल दाखवताच त्याविषयी संस्था चालकांमध्ये तीव्र मतभेद उमटले आहेत. वर्षानुवर्षे तुटपुंज्या मानधनावर काम करणार्‍या शिक्षकांना डावलत पवित्र पोर्टलच्या आधारे थेट नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे समान पात्रता धारक शिक्षकांमध्ये दुजाभाव निर्माण करुन संस्थाचालकांची डोकेदुखी वाढवण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप संस्थाप्रमुखांनी केला आहे.

महाराष्ट्रात १० हजार शिक्षकांच्या जागा भरल्या जाणार आहेत. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भ्रष्टाचार विरहीत पहिलीच शिक्षक भरती होणार असल्याचे शिक्षणमंत्री सांगतात. भरतीवेळी होणारे शिक्षकांचे शोषण थांबवण्यासाठी पोर्टलच्या माध्यामतून मदत होणार आहे. राज्यातील सुमारे पाच हजार शिक्षक अतिरिक्त झाल्याने समायोजनात रिक्त जागा कमी झाल्या. यामध्ये सहा जिल्ह्यातील बिंदू नामावलीनंतर खुल्या, एसईबीसी आणि ईबीसी वर्गासाठी दिसल्यामुळे तेथील बिंदूनामावलीची फेरतपासणी करून त्वरीत भरण्यात येणार आहेत. त्यासाठी शनिवारी जाहीरात प्रसिद्ध होणार असल्याचे सरकारतर्फे सांगण्यात येते. मात्र, शिक्षक भरतीत संस्था चालकांना डावलण्यात येत असून, सरकार एकतर्फी निर्णय घेऊन ही प्रक्रिया राबवत आहे, असे संस्थाचालकांचे म्हणणे आहे. 2012 पासून शिक्षक भरती न झाल्यामुळे अनेक जागा रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. यावर तोडगा काढत संस्था चालकांनी सशर्त संमत्ती दर्शवली आहे. मात्र, शिक्षक भरतीस प्रत्यक्ष प्रारंभ झाल्यास संस्था चालकांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

- Advertisement -

भरतीला वेगळे वळण लागू शकते

समान शैक्षणिक पात्रता असताना शिक्षकांची थेट नियुक्ती होणार असल्याने वर्षानुवर्ष तुटपुंज्या वेतनावर काम करणार्‍या शिक्षकांवर अन्याय झाल्याची भावना निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिक्षक भरतीला वेगळे वळण लागू शकते. संस्था चालकांना शिक्षक नियुक्तीचे अधिकार द्यायला हवे. – डॉ.सुनील ढिकले, चिटणीस, मविप्र

आमचे पूर्णत: समर्थन

उमेदवार निवडीचे अधिकार संस्था चालकांना देण्यात आल्यामुळे या प्रक्रियेस आमचे पूर्णत: समर्थन राहिल. याविषयी संस्थाचालक संघटनेचा विरोध मावळला आहे. – विजय नवलपाटील, अध्यक्ष, संस्थाचालक संघटना

- Advertisement -

लढा सुरुच राहील

२०१२ पासून शिक्षक भरती बंद असल्यामुळे अनेक जागा रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सशर्त शिक्षक भरतीस परवानगी दिली आहे. दहा, बारा वर्षापासून मानधनावर काम करणार्‍या शिक्षकांना कायम करण्यासाठी आमचा लढा सुरुच राहील. – कोंडाजी आव्हाड, अध्यक्ष, क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्था

शिक्षण संस्थाचालकांना शिक्षक भरतीचे अधिकार द्यावेत

शिक्षण संस्थाचालकांना शिक्षक भरतीचे अधिकार द्यायला हवे. अनेक वर्षांपासून काही शिक्षक अत्यल्प मानधनावर काम करतात. त्यांना डावलून शिक्षक भरतीस मुख्याध्यापक संघाचा विरोध आहे. – एस. बी. देशमुख, सचिव, महाराष्ट्र मुख्याध्यापक संघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -