घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकमध्ये दरोडेखोर आणि पोलिसांत चकमक; ३ दरोडेखोरांना अटक

नाशिकमध्ये दरोडेखोर आणि पोलिसांत चकमक; ३ दरोडेखोरांना अटक

Subscribe

दरोडेखोरांपैकी एका दरोडेखोराला नाशिकमध्येच तर दोन दरोडेखोरांना मनमाड रेल्वे स्टेशनवर अटक करण्यात आली. फरार दरोडेखोरांचा शोध सुरू आहे.

नाशिकच्या आडगाव शिवारात पहाटे पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये चकमक झाली. दरोडेखोरांनी पोलिसांवर गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक दरोडेखोर जखमी झाला आहे. ५ दरोडेखोरांपैकी एका दरोडेखोराला नाशिकमध्येच तर दोन दरोडेखोरांना मनमाड रेल्वे स्टेशनवर अटक करण्यात आली. दोन दरोडेखोर अद्याप फरार असून नाशिक पोलिसांकडून शोध सुरु आहे.

नाशिकच्या अडगाव शिवारात पहाटे पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये चकमक झाली. दरोडेखोरांनी पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक दरोडेखोर जखमी. ५ दरोडेखोरांपैकी एकाला नाशिकमध्येच अटक, तर २ दरोडेखोरांना मनमाड रेल्वेस्टेशनवर अटक.

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ಮಾರ್ಚ್ 27, 2019

- Advertisement -

अशी केली कारवाई

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आडगाव परिसरातील एका दुकानावर दरोडेखोरांनी दरोडा टाकला. दरोडा टाकून पळत असतांना पोलिसांनी दरोडेखोरांचा सिनेस्टाईल पाठलाग केला. दरम्यान, दरोडेखोरांची इंडिका गाडी दगडावर आदळून उलटली. त्यानंतर पळ काढणाऱ्या दरोडेखोरांना पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यामधील एका दरोडेखोराने पोलिसांवर गोळीबार केला. या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो जखमी झाला. त्याला पोलिसांनी अटक केली. तर इतर फरार झाले.

दरोडा टाकण्यासाठी वापरलेले साहित्य जप्त

फरार दरोडेखोरांचा पाठलाग करताना पोलिसांनी एकाला नाशिकमध्येच, तर दोन जणांना मनमाड रेल्वे स्थानकावर अटक केली. एकूण तीन दरोडेखोरांना पोलिसांनी अटक केली असून, दोन जण फरार आहेत. नाशिक पोलिसांकडून दरोडेखोरांचा शोध सुरू आहे. दरम्यान, अटक केलेल्या दरोडेखोरांकडून पोलिसांनी दुकानाचे शटर तोडण्यासाठी वापरण्यात आलेल्या कटरसह इतर साहित्य जप्त केले आहे.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -