घरमहा @२८८एरंडोल विधानसभा मतदारसंघ - म.क्र.१६

एरंडोल विधानसभा मतदारसंघ – म.क्र.१६

Subscribe

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल (विधानसभा क्र.१६) विधानसभा मतदारसंघ आहे.

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल हा विधानसभा मतदारसंघ जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. मुंबई – नागपुर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर असलेला हा मतदारसंघ व्यापारी दृष्ट्या देखील महत्वाचा ठरला आहे. एरंडोल विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यावर एरंडोल तालुका पारोळा भडगाव तालुक्यातील काही मंडळे नव्या मतदारसंघात समाविष्ट झाली.त्यामुळे राजकारणाची गणिते बदली.नव्या मतदारसंघात शिवसेनेचा झेडा माजी आ.चिमणराव पाटील यांनी फडकविला.मात्र त्यांना या मतदारसंघावर पाहिजे तशी पकड करता आली नाही. यामुळे 2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे जळगाव जिल्ह्यात एकमेव आमदार म्हणून डॉ.सतिष पाटील हे जिकुन आले.मात्र यावेळेस युतीचे वारे वाहत असल्याने सेनेला पुन्हा आपला गड काबीज करण्यात काहीच अडचण येणार नाही.कारण नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना 115007 मते मिळाली या मतदार संघातुन तर राष्ट्रवादीला 41703 मते पडली.त्यामुळे या विधानसभा क्षेत्रावर युतीची पकड मजबुत झालेली दिसत आहे.

मतदारसंघ क्रमांक : १६

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण : खुला

मतदारांची संख्या
पुरुष : १,४४,५२७
महिला : १,३४,८१०
तृतीयपंथी : २
एकूण मतदान २,७९,३३९

- Advertisement -

विद्यमान आमदार : डॉ.सतिष पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेस

एरंडोल धरणगाव या मतदारसंघावर पुर्वीपासुन कॉग्रेस पक्षाचे राज्य होते. मात्र, १९७८ला जनता दल, १९९०ला ही परंपरा शिवसेनेने खंडित केली. २००४ नंतर मतदार संघाची फेररचना झाल्यानंतर एरंडोल मतदारसंघातुन शिवसेनेचे माजी आ.चिमणराव वाघ यांनी भगवा फडकविला. २०१४ ला डॉ.सतिष पाटील हे राष्ट्रवादी कॉग्रेस कडून विजयी झाले होते. राष्ट्रवादीसाठी ही निवडणुक प्रतिष्ठेची आहे तर पाटील याचे आव्हान ना.महाजन यांनी स्विकारले असल्याने हा मतदार संघ जिकणे त्यांच्यासाठी सुध्दा महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे शिवसेनाला भाजपाचे बळ मिळणार असल्याने शिवसेनेचा भगवा फडकण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचा गड राखण्याण्यासाठी डॉ.सतिष पाटील यांना सर्व आघाड्यावर लढावे लागणार आहे.

एरंडोल विधानसभा मतदारसंघ आमदार सतीश पाटील

२०१४ विधानसभा निवडणुकीची परिस्थिती

डॉ.सतिष पाटील – राष्ट्रवादी कॉंग्रेस – ५५,६५६
चिमणराव पाटील – शिवसेना – ५३,६७३
मच्छिंद्र पाटील – भाजप – २८,९०१


हे ही वाचा – जळगाव लोकसभा मतदारसंघ


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -