घरताज्या घडामोडीया दहा ठिकाणाहूनच खरेदी करता येणार जीवनावश्यक वस्तु

या दहा ठिकाणाहूनच खरेदी करता येणार जीवनावश्यक वस्तु

Subscribe

मालेगावसाठी विशेष नियोजन ः नियंत्रणासाठी दहा अधिकार्‍यांची नियुक्ती

मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महीना सुरू झाला असून रमजान महीन्यात करण्यात येणारया उपवासासाठी फळे घेण्यासाठी नागरिक बाजारपेठेत मोठी गर्दी करत असतात. मालेगाव शहरात करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेत करोनाचा संसर्ग रोखण्याबरोबरच नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळित व्हावा याकरीता शहरातील दहा स्थळे निश्चित करण्यात आली असून त्यांवर नियंत्रण व नियमन करण्यासाठी दहा अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आल्याचे आदेश मालेगाव महापालिका उपायुक्त नितीन कापडणीस यांनी पारित केले आहेत.
मालेगाव शहरात करोनाचा संसर्ग रोखण्याचे मोठे आव्हान येथील प्रशासनासमोर आहे. अशातच नागरिक जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी ही ठिकाणे निश्चित करण्यात आली आहे. यामुळे गर्दीचे विभाजन होउन फिजीकल डिस्टन्सींगचेही पालन होईल. त्याचप्रमाणे या बाजारपेठेत दैनंदिन फळांच्या आवकाची आकडेवारी घेणे, या ठिकाणांवर फिजीकल डिस्टन्सींगची अंमलबजावणी होणे, दररोज वितरीत होणारा माल तसेच किरकोळ व्यापारी व हातगाडी चालक यांची संख्या घेवून अहवाल सादर करणे व एकंदरित संपूर्ण प्रक्रियेवर नियंत्रण व नियमन करण्यासाठी दहा अधिकारी व कर्मचारी यांची देखील नियुक्ती या ठिकाणी करण्यात आल्याचे कापडणीस यांनी कळविले आहे.

ही ठिकाणे निश्चित
निहाल नगर, कल्लू कुट्टी मैदान, सलीम नगर, अहले हादिस इदगाह, ६० फुटी रोड, अब्बास नगर चौक, गांधी नगर, गुलशेर नगर डेपो, जमहुर नगर, अजीज कल्लू स्टेडीयम अशी शहरातील दहा ठिकाण ही घाऊक व्यापार्‍यांकडून किरकोळ व्यापार्‍यांना जीवनावश्यक वस्तू विक्रीसाठी निश्चित करण्यात आली आहेत.

- Advertisement -

पाच वाजेेपर्यंतच परवानगी
ही सुविधा नागरिकांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी करण्यात आली असून, नागरिकांनी प्रशासनाच्या सुचनांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. उपविभागीय दंडाधिकारी यांनी पारित केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन करत सायंकाळी ५ वाजेनंतर कुठल्याही विक्रेत्याने आपली दुकाने, हातगाडी सुरु राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
नितीन कापडणीस,
उपायुक्त महापालिका मालेगांव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -