घरमहाराष्ट्रनाशिकमाजी खासदार देविदास पिंगळे यांची एसीबीकडून चौकशी

माजी खासदार देविदास पिंगळे यांची एसीबीकडून चौकशी

Subscribe

राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक सतीश भामरे यांनी राष्ट्रवादीचे माजी खासदार देवीदास पिंगळे यांची गुरुवारी (दि. ११) कसून चौकशी केली. कार्यालयात सुमारे एक तास त्यांची चौकशी करण्यात आली. चौकशी संदर्भात काही कागदपत्रे देण्यासाठी कार्यालयात आलो असल्याचा पिंगळे यांनी खुलासा केला आहे.
पिंगळे हे नाशिक बाजार समितीचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांच्यावर कर्मचार्‍यांचे वेतन, दिवाळी बोनस, भविष्य निर्वाह निधीचा अपहार केल्याचा आरोप आहे. तसेच, बाजार समितीच्या कर्मचार्‍यांकडून एका वाहनात ५७ लाखांची बेहिशेबी रोकडही एसीबीने जप्त केली होती. या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू आहे.

दरम्यान, नाशिक बाजार समितीमधील आर्थिक व्यवहारांची अनियमितता आणि लाखोंची रोकड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडल्याच्या पार्श्वभूमीवर ही चौकशी झाल्याचे सांगितले जाते आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

- Advertisement -

माझा संबंध नाही

या चौकशीसंदर्भात कातड-पाटील म्हणाले, चौकशीचा अर्ज खूप पूर्वीच मी मागे घेतला आहे. हे प्रकरण आता संपुष्टात आले आहे. त्यामुळे नव्याने सुरू असलेल्या चौकशीशी आपला काहिही संबंध नाही.- पंडितराव कातड पाटील, तक्रारदार

कागदपत्रे द्यायला आलो होतो

पंडीतराव कातड यांनी सन २००९मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे अर्ज करुन माझ्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्या चौकशीसंदर्भात काही कागदपत्रे कमी असल्याने ते देण्यासाठी ‘एसीबी’च्या कार्यालयात आलो होतो. कर्मचार्‍यांचा प्रश्न निकाली लागलेला असल्यामुळे या प्रकरणाचा येथे काहिच संबंध नाही.-देविदास पिंगळे, माजी खासदार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -