घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसराईत गुन्हेगारांच्या टोळीकडून महागडे 38 मोबाईल जप्त

सराईत गुन्हेगारांच्या टोळीकडून महागडे 38 मोबाईल जप्त

Subscribe

भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी, बाजारात व रात्री घरातून मोबाईल चोरी करणार्‍या सराईत गुन्हेगारांच्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात भद्रकाली पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी सापळ रचत दोन सराईत चोरट्यांच्या घरातून ५ लाख ४८ हजार ५०० रुपयांचे महागडे ३८ मोबाईल जप्त केले. जुने नाशिक येथील शफीक तौफिक शेख (वय ३५), नयापुरा, अरब चौक मालेगाव येथील मोहमद आमीन अब्दुल रहीम अन्सारी (वय ४०) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

जुने नाशिकमधील दोन चोरटे चोरी केलेल्या नवीन मोबाईलची शहरात विक्री करत असल्याची माहिती भद्रकाली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकास मिळाली. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने मोबाईल आयएमईआय व तांत्रिक बाबींच्या आधारे तपास सुरु केला. पथकाने मोठा राजवाडा, चौक मंडई, जुने नाशिक येथून शफिक शेख व मोहमद अन्सारीला अटक केली. शफिक शेख याच्या घरातून ३८ मोबाईल जप्त केले. पोलिसी खाक्या दाखवला असता दोघांनी मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. शेख मोबाईलमध्ये सात ते आठ सिमकार्ड वापरत असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी दोघांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -