घरमहाराष्ट्रनाशिककुरिअरमधून पोहोचवत होता महागडे ड्रग्ज

कुरिअरमधून पोहोचवत होता महागडे ड्रग्ज

Subscribe

कामटवाडा रोड परिसरातील एका कुरियर कंपनीतून ड्रग पुरवणारा संशयित ताब्यात

कामटवाडा रोड परिसरातील एका कुरियर कंपनीतून एक युवक एमडीसह इतर महागडे ड्रग्ज देशातील वेगवेगळ्या शहरांत पाठवण्याचे काम करीत होता. कोलकाता येथे एका महिन्यात आलेल्या पाच ते सहा कुरियरमुळे तेथील अधिकार्‍यांनी नाशिककडे मोर्चा वळवत बस्तेला अटक केली आणि संपूर्ण ड्रग रॅकेटची भांडाफोड केली.

ड्रग्जचे पाळेमुळे नाशिक शहरात किती खोल रुतले आहेत हे लक्षात येण्यासाठी कुरिअर कंपनीचे उदाहरण मासलेवाईक म्हणावे लागेल. मागील काही वर्षांत मेफेड्रॉन अर्थात एमडी किंवा म्याव-म्याव या ड्रग्जने नाशकातील युवकांवर कब्जा मिळवला आहे. कोकेन अथवा इतर ड्रग्जपेक्षा स्वस्त आणि उपलब्ध होणार्‍या या ड्रग्जमुळे नाशिकसह अन्य प्रमुख शहरांमध्ये हजारो युवकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. श्रीमंतापासून गरीबापर्यंत आणि तरूणापासून अगदी ११ वर्षांच्या मुलांपर्यंत हा अंमली पदार्थ पोहोचतात. सुरुवातीला मुंबईत पाय पसरलेल्या तस्करांनी आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, कस्टम्स, एक्साइज, अंमलबजावणी मंत्रालय या महत्त्वाच्या विभागांना तूरी देत आपला मोर्चा नाशिककडे वळवला आहे.

- Advertisement -

दोन वर्षांपूर्वी शहर पोलिसांच्या क्राइम ब्रँचच्या पथकाने मध्यरात्रीच्या सुमारास कारवाई करत तिघा तस्करांना बेड्या ठोकल्या होत्या. यातील दोघे सराईत गुन्हेगार होते. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्ज आढळून आले होते. त्यापूर्वी शहरात कोलकाता येथील नार्कोटीक्स विभागाने अशीच कारवाई केली होती. कामटवाडा रोड परिरसरातील एका कुरियर कंपनीतून कमलेश बस्ते हा युवक एमडीसह इतर महागडे ड्रग्ज देशातील वेगवेगळ्या शहरांत पाठवण्याचे काम करीत होता. कोलकाता येथे एका महिन्यात आलेल्या पाच ते सहा कुरियरमुळे ते तेथील अधिकार्‍यांनी नाशिककडे मोर्चा वळवत बस्तेला अटक केली. यानंतर शहर पोलिसांनी ड्रग्ज तस्करांकडे आपला मोर्चा वळवला. सलग दोन महिन्यांच्या तपासानंतर पंचवटीतील तीन तस्कर पोलिसांच्या हाती लागले होते. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी मुंबईतील दोघा संशयितांना अटक केली. त्यांच्या ताब्यातील २२०० ग्रॅम एमडी जप्त करण्यात पोलिसांना यश मिळाले होते. यातील एक सूत्रधार तर धनदांडगा असून, त्याचे वडील विविध चित्रपटांना फायनान्स करतात, अशी माहिती समोर आली. या प्रकरणात पोलिसांचा तपास अद्याप संपलेला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -