घरमहाराष्ट्रनाशिकइंदिरानगरात वॉशिंग मशीनचा स्फोट, घराला आग

इंदिरानगरात वॉशिंग मशीनचा स्फोट, घराला आग

Subscribe

शहरातील इंदिरानगर भागात असलेल्या गुरूकृपा हाईट्स या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील एका घरातील वॉशिंग मशिनचा मंगळवारी, १६ एप्रिलला सकाळी स्फोट झाला. त्यानंतर घराला आग लागली होती.

शहरातील इंदिरानगर भागात असलेल्या गुरूकृपा हाईट्स या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील एका घरातील वॉशिंग मशिनचा मंगळवारी, १६ एप्रिलला सकाळी स्फोट झाला. त्यानंतर घराला आग लागली होती.

इमारतीमधील सिंग कुटुंबाने काही दिवसांपूर्वी वॉशिंग मशिन खरेदी केले होते. घराच्या बाल्कनीत असलेल्या या वॉशिंग मशिनचा सकाळी दहा वाजेच्या सुमारास स्फोट झाला. स्फोटाचा मोठा आवाज आणि धुराचे लोट यामुळे नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला फोन केला. त्यानंतर काही वेळात घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -