घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रकर्जाला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या

कर्जाला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या

Subscribe

नापिक आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबल्याने कुटुंबाचा उदनिर्वाह कसा चालवायचा, या विवंचनेतून तळवाडे दिगर (ता.बागलाण) येथील शेतकर्‍याने शुक्रवारी (दि.२२ ) शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. सुनील बाळू पगार (वय ४२) असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे. याप्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सुनील पगार यांची तळवाडे दिगर येथे पाच एकर शेती आहे. घरची परिस्थिती बिकट असल्याने त्यांनी शेतीवर एचडीएफसी बँकेचे व्याजासह २१ लाख तर डांगसौंदाणे येथील सप्तश्रृंगी महिला बँकेकडून ५ लाखाचे कर्ज घेतले होते. शेतीच्या भांडवलासाठी उसनेवार केली होती. दोन वर्षांपासून भाजीपाला पिकातील खराब वातावरण व पिकून आले तर बाजारभाव अशा संकटांना तोंड देत शेतीचा गाडा ओढत होते. त्यासाठी मित्रमंडळी व नातेवाईकांकडून उसनेवार पैसे घेतले होते. कर्ज व उसनेवार घेतलेले पैसे कसे फेडणार, कुंटुबाचा उदनिर्वाह कसा करायचा, याच विवंचनेत ते कायम असायचे. ते शुक्रवारी सकाळी त्यांच्या शेतातील टरबूज फवारणीसाठी शेतात गेले असता त्यांनी शेतातील आंब्याच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान फवारणीसाठी वडिलांना मदतीसाठी गेलेल्या त्यांच्या मुलाने सर्व प्रकार पहिल्यानंतर ग्रामस्थांनी आत्महत्येबाबत माहिती दिली. सटाणा पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक, पंकज सोनवणे व जयंतसिंग सोळखे करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -