पावसाच्या अंदाजाने लगबगीने कामे आवरणे पडले महागात; वीज पडून शेतकरी ठार

Nashik
farmer
आज महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहिर करण्यात आली.

इगतपुरी तालुक्यात भंडारदरावाडी येथे बुधवारी दुपारी झालेल्या वादळी पावसात वीज अंगावर पडून एक शेतकरी ठार झाल्याची घटना घडली. किसन हनुमंत खाड़े (वय 65, रा भंडारदरावाडी ता. इगतपुरी) असे मृत शेतक-याचे नाव आहे.

बुधवारी दुपारी जेवण करून ते शेताकडे जात होते. पावसाचा अंदाज आल्याने त्यांनी लगबगिने शेतातील कामे आवरुन घेत असताना वीजेचा लोळ त्यांच्या अंगावर येवून पडला. त्यात ते जागीच ठार झाले. त्यांचे पश्चात एक मूलगा, एक मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी पोलीस पाटील यांनी घोटी पोलिसांना माहिती दिली असून पंचनामा करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here