विनाअपघात प्रवासीसेवा करणार्‍या चालकांचा उद्या होणार सत्कार

नाशिक विभागातील 196 चालकांना मिळणार रोख रकमेसह सुरक्षित सेवा पद्क

Nashik

एसटी महामंडळाच्या गाड्यातून प्रवास करणार्‍या नागरिकांना विनाअपघात सेवा देणार्‍या एसटीचालकांना प्रोत्साहन म्हणून महामंडळाने नाशिक विभागातील सर्व आगारातील विना अपघात प्रवासीसेवा करणार्‍या 196 चालकांचा सत्कार स्वातंत्र्यदिन निमित्त उद्या (दि.15) करणार आहे.

महामंडळाने नाशिक विभागीय कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण झाल्यानंतर 196 चालकांना सुरक्षित सेवेचे पदक देऊन गौरविण्यात येणार आहे. तर 13 विविध आगारांमध्ये 530 चालकांना रोख बक्षीसे देवून गौरविण्यात येणार आहे. एसटी महामंडळ सुरक्षित वाहतुक करणार्‍या एसटीचालकांना प्रोत्साहित करण्यासाठी विविध योजना राबविते. त्यात सुरक्षित सेवेचे पदक आणि रोख बक्षीस योजनेचा समावेश आहे. ज्या चालकांनी 5 ते 30 वर्षे विना अपघात प्रवासीसेवा केली असेल, त्यांना सुरक्षित सेवा पदक देण्यात येते. तर एका वर्षात 260 दिवस विना अपघात सेवा देणार्‍या चालकांना 1 हजार रूपये रोख बक्षीस तर, दोन वर्षात 260 दिवस अपघात विरहित वाहन चालवणार्‍या चालकांना 600 रूपये रोख देऊन गौरविण्यात येते. त्यानुसार या स्वातंत्र्यदिनी गैारव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

सुरक्षित सेवेचे पदके

कालावधी(वर्ष)    पदके
30                     2
25                   10
20                   13
15                   01
10                   08
5                   162