घरताज्या घडामोडीमहिला डॉक्टरला मारहाण

महिला डॉक्टरला मारहाण

Subscribe

आडगावl पंचवटीत आशासेविकांना रूग्णाने शिवीगाळ केल्याची घटना ताजी असताना शुक्रवारी कोरोनाबाधित रूग्णाच्या घरी महापालिकेच्या जिजामाता रूग्णालयातील प्रसुती तज्ज्ञ महिला डॉक्टर विचारपूस करण्यासाठी आल्या असता रूग्णाने त्यांना मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (दि.३) पंचशीलनगरमध्ये घडली. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून पुन्हा डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी महिला डॉक्टरने भद्रकाली पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे.

नाशिक शहरात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रूग्णसंख्येमुळे आरोग्य विभाग हादरून गेला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून महापालिकेच्या रूग्णालयातील डॉक्टरांवर अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार जिजामाता रूग्णालयातील प्रसुती तज्ज्ञ महिला डॉक्टर भद्रकाली परिसरातील रूग्ण व त्यांच्या संपर्कात आलेल्यांवर उपचार करत आहेत. प्रत्यक्षात त्या प्रसुती तज्ज्ञ असल्याने त्यांच्याकडे गर्भवती महिला आरोग्य तपासणीसह प्रसुतीसाठी येत आहेत. त्यामुळे गर्भवती महिलेसह नवजात बालकांच्या सुरक्षेसाठी करोनाबाधित रूग्णाच्या संपर्कात प्रसुती करणार्‍या डॉक्टरने जावू नये, यासाठी महिलेने डॉक्टरने तीनवेळा महापालिकेच्या आरोग्य विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, त्यांच्याकडे आरोग्य विभागाने दुर्लक्ष केले आहे.
शुक्रवारी (दि.३) महिला डॉक्टर पंचशीलनगर येथील रूग्णांची विचारपूस करण्यात आल्या. त्यांनी कुटुंबियांकडे रूग्णांबाबत विचारणा केली असता राग अनावर झाल्याने रूग्णाने त्यांना मारहाण केली. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात नाराजी पसरली आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत संबंधितावर गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -