शुभम प्रकरण; हल्लेखोर पोलिसाविरुद्ध अखेर गुन्हा

नाशिकरोड तपासणीदरम्यान डोक्यात दंडुका टाकून शुभमला गंभीर जखमी केलेल्या हल्लेखोर पोलीस कर्मचारी रवींद्र खोंडे यांच्याविरुद्ध तब्बल १२ दिवसांनी शुभमची आई व भाऊ यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात शनिवारी (ता.१) सायंकाळी तक्रार दिली. त्यानुसार नाशिकरोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

Nashik
SHUBHAM Case
मेंदूवरील शस्त्रक्रियेनंतर उपचार घेत असलेला शुभम.

नाशिकरोड तपासणीदरम्यान डोक्यात दंडुका टाकून शुभमला गंभीर जखमी केलेल्या हल्लेखोर पोलीस कर्मचारी रवींद्र खोंडे यांच्याविरुद्ध तब्बल १२ दिवसांनी शुभमची आई व भाऊ यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात शनिवारी (ता.१) सायंकाळी तक्रार दिली. त्यानुसार नाशिकरोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

देवळाली गावातील शुभम महाले याच्यावर २१ मे रोजी सिन्नरफाटा येथे वाहन तपासणीदरम्यान पोलीस कर्मचार्‍याने दंडुका मारला होता. यात शुभमच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तो कोमात गेला होता. ‘आपलं महानगर’ने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी स्वत: रुग्णालयात जाऊन चौकशी केली होती. त्यानंतर विविध पक्षांचे पदाधिकारी व सामाजिक संघटनांनी पोलिसांच्या हल्ल्याचा निषेध केला होता. यामुळे आयुक्त नांगरे-पाटील यांनी सहायक पोलीस आयुक्त ईश्वर वसावे यांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे अहवाल तयार करण्यात आला. दरम्यान पोलिसावर गुन्हा दाखल करण्यासाठी राजकीय दबाव वाढत असताना नाशिकरोड पोलीस ठाण्यात सर्व पक्षीय पदाधिकारी व नगरसेवकांनी ठाण मांडले होते. परंतू तपास चालू असल्याचे कारण सांगून पोलिसांनी दोन दिवस देण्याची मागणी केली होती.

शनिवारी १ जून रोजी सायंकाळी शुभम महाले याची आई पूजा महाले व भाऊ ओमकार यांनी प्रत्यक्ष येऊन रवींद्र खोंडे या हल्लेखोर पोलिसाविरुद्ध तक्रार दिली. नाशिकरोड पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ३३८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान शुभमच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. पोलिसाने हल्ला केल्याने शुभमच्या जीवितास धोका उद्भवला. त्यामुळे त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई व्हावी, अशी मागणी आम आदमीचे राज्य प्रवक्ता जितेंद्र भावे यांनी केली आहे.

सामान्य व्यक्तीप्रमाणेच दोषी पोलिसावर कारवाई

पोलीस आहे म्हणून वेगळा न्याय असे काही नाही. अंतर्गत झालेली चौकशी व तक्रारदाराने दिलेली तक्रार याच्या आधारावर सामान्य व्यक्तीप्रमाणेच कायद्याने व नियमाने कारवाई होणार आहे. – अमोल तांबे, पोलीस उपायुक्त

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here