घरताज्या घडामोडीनाशिक महापालिकेतील शिवसेना गटनेते विलास शिंदे यांचा कार्यालयाला आग!

नाशिक महापालिकेतील शिवसेना गटनेते विलास शिंदे यांचा कार्यालयाला आग!

Subscribe

नाशिक महापालिकेच्या गटनेता कार्यालयाला आज (शुक्रवारी) सकाळी भीषण आग लागली आहे. माहितीनुसार  महापालिकेतील शिवसेना गटनेते विलास शिंदे आणि अजय बोरस्ते यांच्या कक्षाला आग लागली आहे. राजीव गांधी भवन मधील हा कक्ष दुसऱ्या मजल्यावर आहे. या आगीमुळे नाशिक महापालिकेच्या मुख्यालयात एकच खळबळ उडाली. आग विझवण्यासाठी अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले असून आतापर्यंत जीवितहानी झाली नाही आहे. या भीषण आगीचे लोळ नाशिक महापालिकेत पसरले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांचे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थाचे प्रयत्न सुरू आहेत.

या आगीमुळे संपूर्ण महापालिकेत धुराचे लोट पसरले आहेत. या भीषण आगीची भीषणता खूपच तीव्र असून कार्यालयातील साहित्य जळून खाक झाले आहेत. आगी विझवण्यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांनी रुमचे दरवाजे तोडले. शॉर्ट सक्रिटमुळे ही आग लागलण्याची शक्यता प्राथमिक अंदाजानुसार सांगण्यात येत आहे. दरम्यान सुदैवाने जेव्हा आग लागली त्यावेळेस शिवसेनेने कुणीही पदाधिकारी कार्यकर्ते कार्यालयात उपस्थित नव्हते.

- Advertisement -

 

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Thursday, January 21, 2021


हेही वाचा – सीरम इन्स्टिट्यूटच्या मांजरीतील इमारतीला आग

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -