Corona : चार महिन्यानंतर नाशिकमध्ये पहिल्यांदाच रुग्णसंख्या घटली

corona virus

नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. चार महिन्यानंतर पहिल्यांदाच २४ तासांमध्ये १७१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यात नाशिक ग्रामीण ३९, नाशिक शहर १२५, मालेगाव ५ आणि जिल्ह्याबाहेरील २ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात ३८६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.30 टक्के आहे. यामध्ये नाशिक ग्रामीण ८७.76, नाशिक शहर ९४.२७ टक्के, मालेगाव ९३.60 आणि जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८२.९३ टक्के आहे.

मंगळवारी दिवसभरात १२ रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये नाशिक शहर ३, मालेगाव १, नाशिक ग्रामीणमधील ८ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या ५ हजार ४६५ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये नाशिक ग्रामीण २ हजार ६४०, नाशिक शहर २ हजार ६४७, मालेगाव ९७ आणि जिल्ह्याबाहेरील ८१ रुग्णांचा समावेश आहे. आजअखेर जिल्ह्यात ९२ हजार ४२७ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले असून ८५ हजार ३०७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये नाशिक ग्रामीण २३ हजार १६८, नाशिक शहर ५७ हजार ७१३, मालेगाव ३ हजार ८४८ आणि जिल्ह्याबाहेरील ५७८ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात १ हजार ६५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात नाशिक ग्रामीण ५९१, नाशिक शहर ८६०, मालेगाव १६६, जिल्ह्याबाहेरील ३८ रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात रेट इंफेक्शनमध्ये घट

नाशिकमध्ये दिवसेंदिवस लक्षणे व संशयित रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहेत. तसेच संपर्क येणार्‍या रुग्णांचेही प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा कमी होत आहे. आधी निफाड, सिन्नर, मालेगाव तालुक्यात रेट इंफेक्शन सर्वाधिक होता. मात्र, वेळीच उपाययोजना केल्याने रेट इंफेक्शन कमी झाला आहे.

अनंत पवार, निवासी अधिकारी, जिल्हा रुग्णालय