घरमहाराष्ट्रनाशिककळवण तालुक्यात बिबट्याचे कातडे विक्री करणाऱ्या ५ जणांना अटक

कळवण तालुक्यात बिबट्याचे कातडे विक्री करणाऱ्या ५ जणांना अटक

Subscribe

बिबट्याचे कातडे विक्रीसाठी घेवुन जाण्याच्या तयारीत असलेल्या व्यक्तीसह चार संशयितांना नाशिक ग्रामीण पोलिस व वनविभागाने संयुक्त कारवाई करत कळवण येथे अटक केली. या प्रकाराने तालुक्यात खळबळ उडाली आहे. या संशयितांना न्यायालयाने १९ जानेवारीपर्यंत कोठडी सुनावली.

कळवण तालुक्यातील भैताणे फाट्यावर एक व्यक्ती पिशवीत बिबट्याची कातडी विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष तपास पथकाला मिळाली होती. सापळा रचत पथकाने भाऊराव रामचंद्र गायकवाड (रा. भैताणे, ता. कळवण) याला ताब्यात घेत त्याच्याकडून १० लाख रुपये किंमतीचे बिबट्याचे कातडे जप्त केले. दरम्यान, नाशिक ग्रामीण विशेष पोलिस पथक व वनविभागाने गायकवाड यांच्यासह संजय सीताराम भान्शी (रा. भांडणे ता. कळवण), राजु पंढरीनाथ चौरे (रा. भांडणे, ता. कळवण), विश्वनाथ परशराम पालवी (रा. वडाळेवणी, ता. कळवण) व अमरचंद महादू बागुल (रा. उंबरेबन, ता. कळवण) या संशयितांना अटक केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -