नाशिक जिल्ह्यातील पाचजणांना पोलीस पदक

उल्लेखनीय कामगिरीबद्दल दिल्या जाणार्‍या राष्ट्रपती पोलीस पदक नाशिकच्या पाचजणांना जाहीर झाले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने शनिवारी (दि.२५) राज्यातील 54 पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांची या पदकांसाठी घोषणा केली. त्यात नाशिक शहर आयुक्तालयातील दोन, ग्रामीणमधील एक, तर राज्य गुप्तवार्ता विभागाच्या दोन अधिकार्‍याचा समावेश आहे.

nashik
54 police personnel maharashtra get gallantry awards republic day
प्रातिनिधीक फोटो

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयानेराष्ट्रपती पोलीस पदक, जीवन रक्षा पदक, अग्निशमन सेवा पदक, नागरीसेवा दल इ. पदकांची घोषणा केली. राष्ट्रपती पोलीस पदकांमध्ये उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलिसांना दिले जाणारे शौर्य पदक, विशिष्ट सेवापदक व गुणवत्ता सेवापदक जाहीर करण्यात आले. त्यात देशातील 1040 पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांचा समावेश आहे. नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक मेहबुबअली जियाद्दीन सैय्यद आणि सातपूर पोलीस ठाण्याचे मुख्य पोलीस हवालदार संजय राजाराम वायचळे यांच्यासह ग्रामीण पोलीस दलातील दहशतवाद विरोध पथकातील विष्णु गोसावी यांचाही पोलीस पदकाने सन्मान होणार आहे. राज्य गुप्तवार्ता विभाग, नाशिक युनिटचे अधिकारी बाबुराव दौलत बिर्‍हाडे व सूर्यकांत धर्मा फोकणे यांना पोलीस पदक जाहीर झाले आहे.