घरमहाराष्ट्रनाशिकगोदावरीला पुन्हा पूर

गोदावरीला पुन्हा पूर

Subscribe

गंगापूर धरणातून करण्यात आलेल्या विसर्गामुळे गोदाकाठी पूरपरिस्थिती

धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु असल्याने गंगापूर धरणातून आज सकाळपासून ३४२६ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे. तरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे..

गंगापूर धरण 100% भरले असून धरणक्षेत्रात पाऊस सुरू असल्याने गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात करण्यात येत आहे तसेच शहरातील नालयांमधून देखील पाणी गोदापात्रात येत असल्याने गोडाकाठी पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

- Advertisement -

गोदावरीला पुन्हा पूर

गंगापूर धरणातून 3426 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने आणि सकाळपासून शहरात संततधार सुरू असल्याने शहरातील नाल्यांचे पाणी गोदावरीला मिळाल्याने गोदाकाठी पुन्हा पूर परिस्थिती

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 9, 2019

तरी जिल्हा प्रशासनातर्फे नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत नदी, नाले, ओढा यामध्ये प्रवेश करु नये तसेच पुलावरुन पाणी वाहत असल्यास पुल ओलांडू नये. विद्युत खांबापासून दूर रहावे. जनावरांना नदीपत्रापासून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे. त्याचप्रमाणे वाहत्या पाण्यामध्ये कोणीही पोहण्याचा प्रयत्न करु नये, तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, धोकेदायक क्षेत्रात सेल्फी काढू नये, पंचवटी क्षेत्रातील भाविकांची वाहने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावी.  असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नाशिक यांच्यामार्फत करण्यात येत आहे.

दुपारी चार वाजता विविध धरणांमध्ये करण्यात आलेला विसर्ग

  • गंगापूर –  3426 क्यूसेक्स
  • भावली –  588 क्यूसेक्स
  • आळदी – 687 क्यूसेक्स
  • कश्यपी –  218 क्यूसेक्स
  • दारणा – 8896 क्यूसेक्स
  • मुकणे  – 871 क्यूसेक्स
  • नांदूर मधमेश्वर –  8938 क्यूसेक्स
  • होळकर पूल –  3590 क्यूसेक्स
  • पुनद(गिरणा) –  4532 क्यूसेक्स
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -