घरमहाराष्ट्रनाशिकयेवल्यात आदिवासी वस्ती पुराच्या पाण्याखाली

येवल्यात आदिवासी वस्ती पुराच्या पाण्याखाली

Subscribe

बोकटे- कोळगंगा नदीला पूर आल्याने कोंबडवाडीतील आदिवासी वस्ती पाण्यात

येवला : तालुक्यातील अंदरसुल परिसरात मंगळवारी सायंकाळनंतर अचानक झालेल्या जोरदार पावसामुळे कोळगंगा नदीपात्रात पाणीपातळी मोठ्या प्रमाणावर वाढली. रात्री १० वाजेच्या सुमारास बोकटे गावातीलच आदिवासी वस्तीत लोक झोपेत असताना अचानक संपूर्ण वस्तीत पाणी शिरलं आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. अगोदरच कोरोनाने कंबरडे मोडले असताना आता पुराने संसार उद्ध्वस्त होऊन दुकाने, अन्य साहित्याचेही नुकसान झाल्याने नागरिकांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

गोरगरिबांच्या कोंबडवाडी या वस्तीत रात्रीच्या सुमारास पुराचे पाणी घुसल्याने ग्रामस्थ भेदरले होते. योग्य उपाययोजना केल्या जात नसल्याने व जिल्हा परिषद प्रशासनाकडून चुकीच्या ठिकाणी बंधारा घातला गेल्याने ही समस्या उद्भवल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या आपत्तीने ग्रामस्थांत संतापाची लाट उसळली आहे. गाढ झोपेत असलेल्या नागरिकांना प्रशासनाच्या चुकीमुळे जीवाशी खेळावे लागत असून, अशा चुका वेळीच सुधारून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य त्या उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे, अशी मागणी केली जात आहे. याप्रकरणी आता तहसीलदार,गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -