घरमहाराष्ट्रनाशिकविनयभंगप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक चांदवडकरांना कोठडी

विनयभंगप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक चांदवडकरांना कोठडी

Subscribe

महिलेस व्हॉट्सअपवर अश्लील मेसेज पाठवून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करणे आणि पिडीतेचा पाठलाग करून विनयभंग केल्याप्रकरणी भारतीय जनता पार्टीचे माजी स्विकृत नगरसेवक विक्रांत चांदवडकर यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

vikrant chandawadkar
विक्रांत चांदवडकर

महिलेस व्हॉट्सअपवर अश्लील मेसेज पाठवून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करणे आणि पिडीतेचा पाठलाग करून विनयभंग केल्याप्रकरणी भारतीय जनता पार्टीचे माजी स्विकृत नगरसेवक विक्रांत चांदवडकर यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. मोबाईलवर अश्लील मेसेज पाठविले, याविषयी कोणाला माहिती दिली तर कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी चांदवडकर यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

पोलीसांच्या माहितीनुसार, विक्रांत चांदवडकर (रा. तेलीवाडा, अशोकस्तंभ) याने महिलेस व्हॉट्सअप व फेसबुकद्वारे अश्लिल मेसेज पाठवत तिचा छळ केला आणि शरीरसुखाची मागणी केली. २४ एप्रिल २०१६ रोजी हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच, १७ मे २०१९ रोजी फोन करुन शरीरसुखाची मागणी केली. या प्रकरणी पीडित महिलेनी मंगळवारी (ता. २१) पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांची भेट घेऊन आपली तक्रार मांडली. तसेच या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाची फिर्याद दिली. सायबर क्राईम अ‍ॅक्टअंतर्गत पोलिसांनी चांदवडकर यांच्याविरोधात ६६ (इ) व ६७ असा गुन्हा नोंदवला आहे. चांदवडकर यांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना २७ मे २०१९ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. सी. सांगळे करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -