घरमहाराष्ट्रनाशिकजिल्ह्यातील धरणांत २१ टक्के साठा

जिल्ह्यातील धरणांत २१ टक्के साठा

Subscribe

नाशिक जिल्ह्यातील धरणांनी तळ गाठला आहे. दुष्काळाची दाहकता आणि पाण्याची वाढती मागणी यामुळे जिल्ह्यात चार धरणे कोरडीठाक पडली असून, आणखी चार धरणांची काही दिवसांत अशीच अवस्था होणार आहे.

नाशिक जिल्ह्यातील धरणांनी तळ गाठला आहे. दुष्काळाची दाहकता आणि पाण्याची वाढती मागणी यामुळे जिल्ह्यात चार धरणे कोरडीठाक पडली असून, आणखी चार धरणांची काही दिवसांत अशीच अवस्था होणार आहे.

राज्यात पाण्याच्या बाबतीत समृद्ध असलेला जिल्हा म्हणून नाशिक ओळखला जातो. जिल्ह्यात मोठी आणि मध्यम आकाराची मिळून २४ धरणे आहेत. ६५ हजार ८१४ दशलक्ष घनफुट या धरणांची साठवण क्षमता असून, या धरणांमध्ये आजमितीस १३ हजार ५९७ दशलक्ष घनफुट म्हणजेच २१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. विशेष म्हणजे हे उपलब्ध पाणी ३१ जुलैपर्यंत पुरवण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे. नाशिक शहरासह तालुक्याला पाणी पुरवठा करणार्‍या गंगापूर धरण समूहामध्ये सद्यस्थितीत ३३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पालखेड धरण समूहामध्ये केवळ १५ टक्के पाणी शिल्लक आहे. गिरणा खोर्‍यात आजमितीस ४५ टक्के उपयुक्त साठा शिल्लक असून, या उपलब्ध पाण्यावरच दुष्काळी परिस्थितील भिस्त अवलंबून असणार आहे. गंगापूर धरणात केवळ २७ टक्के पाणी शिल्लक असून, ते जुलै अखेरपर्यंत पुरवावे लागणार असल्याने नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

- Advertisement -

चार धरणे कोरडीठाक

पुरेशा प्रमाणात पाऊस न झाल्याने यंदा धरणांमध्ये क्षमतेपेक्षा कमी पाणीसाठा उपलब्ध झाला. परंतु रहिवाशांची दैनंदिन पाण्याची गरज भागविणारी धरणे आता तळाकडे जाऊ लागली आहेत. पालखेड धरण समुहामधील पुणेगाव, नांदुरमध्यमेश्वर, गिरणा खोर्‍यातील नागासाक्या आणि माणिकपुंज या धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा शुन्यावर पोहोचला आहे. तिसगाव, कडवा, भावली, भोजापूर या धरणांमधील पाणीसाठाही सात टक्क्यांच्या खाली आला आहे.

धरण उपयुक्त पाणी साठा (टक्केवारीत)

गंगापूर २७, काश्यपी ६७, गौतमी गोदावरी २२, आळंदी २०, पालखेड २५, करंजवण १९, वाघाड ११, ओझरखेड ३१, पुणेगाव ००, तिसगाव ०७, दारणा २४, भावली ०६, मुकणे ११, वालदेवी १९, कडवा ०२, नांदूर मध्यमेश्वर ००, भोजापूर ०१, चणकापूर २०, हरणबारी ३०, केळझर २४, नागासाक्या ००, गिरणा १९, पुनद ५७, माणिकपूंज ००.

- Advertisement -

सरासरी एकूण २१

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -