घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकमध्ये कर परताव्यापोटी 17 कोटींची फसवणूक

नाशिकमध्ये कर परताव्यापोटी 17 कोटींची फसवणूक

Subscribe

नाशकात बनावट कपात दाखवून आयकर विभागाला चुना

नाशिकमधील 10 कंपन्यांतील सुमारे 1888 कर्मचार्‍यांचे गत तीन आर्थिक वर्षातील आयकर विवरणपत्रे भरून त्यापोटी कर परताव्याचे बनावट कागदपत्रे बनवून दाव्यांद्वारे 16 कोटी 77 लाख 47 हजार रुपयांचा कर परतावा घेण्यात आला आहे. बनावट कागदपत्रांच्या दावे सादर करून आयकर विभागाची फसवणूक करण्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत मुंबईनाका पोलिसांत आयकर अन्वेषण अधिकारी धनराज बोराडे यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार, नाशिक विभागीय आयकर निदेशकांच्या आदेशानुसार संभाजी चौकातील शकुंतला पार्क येथील रहिवासी असलेले किशोर राजेंद्र पाटील यांच्यावर कलम 133 (ए)नुसार कारवाई करण्यात आली असताना यात किशोर पाटील यांनी नाशिक औद्योगिक वसाहतीतील नामांकित कंपन्यांपैकी बॉस, सिएट, महिंद्रा अ‍ॅन्ड महिंद्रा, सीएनपी, आयएसपी, एमएसईबी, ग्राफाईटी, गायत्री पेपर, एचएएल आदी 10 कंपनी व निमसरकारी विभागातील 1 हजार 888 कर्मचार्‍यांचे 2018-19 या आर्थिक वर्षासह मागील दोन आर्थिक वर्षातील विवरणपत्रे आयकर विभागाकडे दाखल केलेले होते. या प्रकरणी आयकर अधिकार्‍यांनी पाटील यांच्या कार्यालयात जावून तपासणी केली. त्यात पाटील यांनी स्वतंत्र आयकरपत्रे तयार करून आयकर कायद्याच्या गृहसंपती पासून नुसाने, कलम 80 सी, डी, डीडी. ई आणि जी खाली कट कारस्थान करून बनावट कपाट दर्शवली.तसेच बँगलोर येथे ऑनलाइन सीपीसी दावे दाखल केले होते.

- Advertisement -

हे देखील वाचा – ‘कडकनाथ’ फसवणुकीचे लोण नाशिकमध्ये


या दाव्यांच्या पोटी कर्मचार्‍यांच्या नावे शासनाकडून 16 कोटी 77 कोटी 74 हजार एवढी रकम व्याजासह परतावा म्हणून घेत अपहार केला. ही बाब उघडकीस आल्याने सोमवारी (दि.9) आयकर विभागाच्या अधिकार्‍यांनी किशोर पाटील यांच्या कार्यालयावर धाड टाकून महत्त्वाची कागदपत्रे, पेनड्राईव्ह जप्त केलेले आहेत. पाटील यांनी कागदपत्रात फेरफार करून उत्पन्न कमी दर्शविलेले आहे. तसेच कर्मचार्‍यांच्या विवरणपत्रांमध्ये बदल करून बनावटपत्रे आयकर विभागाकडे सादर केल्याचे आढळलेले आहे. आयकर विभागाने सुमारे 200 कर्मचार्‍यांचे जाब-जबाब घेतले आहेत. त्यांच्या खात्यावर ऑनलाईन परतावा जमा झालेला आहे. त्यापोटी पाटील याने 20 टक्के रकम फि म्हणून घेतलेली आहे, असे कर्मचार्‍यांनी आयकर विभाग अधिकार्‍यांना चौकशीत सांगितले आहे. चौकशी दरम्यान 573 कर्मचार्‍यांची फसवणुक झाल्याचे आढळून आलेले आहे. त्यांनी परताव्यापोटी शासनाकडून घेतलेली 11 कोटी 57 लाख रुपये रकम व्याजासह जमा केली आहे. तसेच अजून किती कर्मचार्‍यांच्या नावावर किशोर पाटील याने बनावट विवरण पत्रे बनविली आणि शासनाची फसवणूक केली, याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -