घरमहाराष्ट्रनाशिकग्राहकाचे १७ लाख घेऊन ठेकेदार फरार

ग्राहकाचे १७ लाख घेऊन ठेकेदार फरार

Subscribe

एका रो-हाउसचा व्यवहार पूर्ण करून ते पुन्हा बांधून देण्याच्या अटीवर ठेकेदाराने रो-हाउसच्या मालकाकडून १७ लाख रूपये घेतले. त्यानंतर काम न करता पळ काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी पोपट बाबूलाल निकम (५०, कल्याण (जि.ठाणे) नाशिकरोड पोलीस ठाण्यात ठेकेदाराविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. रामपाल रामजी चौहान (रा.उत्तरप्रदेश) असे फरार झालेल्या संशयिताचे नाव आहे. रामपाल याने २० नोव्हेंबर २०१४ ते जानेवारी २०१८ पर्यंत चेहेडी पंपिंगजवळ रो-हाऊस क्रमांक ३ व ४ चा व्यवहार पूर्ण केला. हा व्यवहार २१ लाख १० हजार रुपयांत ठरल्यावर त्या बदल्यात रामपाल याने निकम यांच्याकडून वेळोवेळी १७ लाख रुपये घेतले. पैसे घेतल्यावर त्याने रो-हाउसचे बांधकाम पूर्ण न करता पळ काढला. तो फरार झाल्याचे लक्षात येताच निकम यांनी रामपाल विरोधात पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -